Global Warming : ग्लोबल वार्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक वर्षांपासून गोठलेल्या हिमनद्या वितळवत आहेत. यामुळे समद्राच्या पातळीत वाढ होत आहे. अनेक प्राणी आणि पक्षी नामशेष होत आहेत. याच ग्लोबल वार्मिंगच्या थेट मनुष्याच्या नातेसंबधावर परिणमा होत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. जागतिक सर्वेक्षणात याबाबत धक्कादायक खुलासा झाला. या सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती चिंताजनक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या तापमानासोबत घरगुती हिंसाचाराचे प्रमाणही वाढत आहे. भारत आणि आसपासच्या देशांमध्ये जागतिक तापमानवाढीमुळे घरगुती आणि लैंगिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती या सर्वेक्षणात समोर आली आहे. ग्लोबल वार्मिंगचा वैयक्तिक संबंधांवरही परिणाम होत आहे. महिलांवरील इंटिमेट पार्टनर वायलेंस  (IPV) वाढत आहे. 


कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ


ग्लोबल वार्मिंगचा परिणाम फक्त भारतच नाही तर, पाकिस्तान आणि नेपाळमध्येही दिसून आला आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये 1.94 लाखांहून अधिक महिलांनी त्यांच्यासोबत भावनिक, शारीरिक आणि लैंगिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार केली आहे. 15 ते 49 या वयोगटातील या महिला आहेत.  हा डेटा 1 ऑक्टोबर 2010 ते 30 एप्रिल 2018 पर्यंतचा आहे.  JAMA Psychiatry मध्ये हा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला आहे. 


भविष्यात अशा घटना आणखी वाढण्याची भिती


जेव्हा वार्षिक तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढते तेव्हा IPV चे प्रमाण 4.9 टक्क्यांनी वाढते. सर्वाधिक शारीरिक हिंसाचाराची नोंद झाली. शारीरिक हिंसा 23 टक्के, भावनिक हिंसा 12.5 टक्के आणि लैंगिक हिंसा 9.5 टक्के आहे. सरासरी वार्षिक तापमान 20 °C ते 30 °C होते असे संशोधकांनी केलेल्या निरीक्षणात समोर आले आहे. सातत्याने ग्लोबल वार्मिंगमध्ये वाढ होत आहे. यामुळे भविष्यात  हिंसेची प्रकरणे 28.3 टक्के, लैंगिक हिंसा 26.1 आणि भावनिक हिंसाचार 8.9 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. भारतातील IPV ची पातळी 2090 पर्यंत 23.5 टक्क्यांपर्यंत वाढेल.हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम भारत, चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये सर्वाधिक दिसून आला आहे. या देशांतील अनेक शहरांमध्ये सतत उष्णतेची लाट येत आहे. ृ


ग्लोबल वार्मिंगमुळे लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचारात वाढ का होतेय?


ग्लोबल वार्मिंगमुळे नाते संबध बिघडण्याच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात तसेच शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या घरांमध्ये घडत आहेत. ग्लोबल वार्मिंगमुळे  वातावरणात मोठे बदल होत आहेत. लहरी हवामानाचा फटका पिकांना बसत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी  तणाव वाढत आहे. यामुळे कुटुंबात वाद विवाद होऊन नाते संबध बिघडत आहेत.