जिनेव्हा : भारताने (India) म्यानमारच्या (Myanmar)मुद्यावर मौन सोडत संपूर्ण जगाने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. म्यानमारच्या सैन्याच्या हिंसक कारवायांचा भारताने शुक्रवारी निषेध केला आहे. जगाला तेथील परिस्थितीवर अधिक दृढतेने काम करावे लागेल. जर तसे झाले नाही तर म्यानमारच्या अस्थिरतेचे परिणाम इतर देशांवरही होऊ शकतात, असे भारताने म्हटले आहे. म्यानमारच्या सैन्याने ऑंग सॅन सू की (Aung San Suu Kyi)यांची सत्ता उलथवून लावण्यााठी त्यांच्यासह प्रमुख नेत्यांना अटक केली आहे.


'असे व्हायला नको होते' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त राष्ट्रात (UN) भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी के नागराज नायडू (K. Nagaraj Naidu)यांनी म्यानमार प्रश्नावर बैठकीत म्हटले आहे की, भारत म्यानमारमधील हिंसाचाराचा निषेध करतो आणि जीव-संपत्तीच्या नुकसानीचा निषेध करतो. तिथे जे घडले ते होऊ नये.  अशा वेळी अधिकाधिक संयम बाळगण्याची गरज आहे आणि मानवी मूल्य आणि हक्क पाळण्याचीही आपली जबाबदारी आहे.'


नायडू म्हणाले की, भारत आणि म्यानमारमधील संबंध खूप चांगले राहिले आहेत. आम्हाला तेथे शांतीपूर्ण तोडगा मिळावा, अशी आपली इच्छा आहे. ते पुढे म्हणाले की, भारताची जमीन आणि समुद्र भाग म्यानमारबरोबरच्या सीमेला जोडली गेली आहे. म्यानमारमधील लोकांशी आमचे दीर्घकाळ मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तेथील राजकीय स्थिरतेबद्दल आम्हाला खूप चिंता आहे.  अशावेळी परिस्थिती कशी नियंत्रणात आणली पाहिजे याचा निर्णय घेतला पाहिजे. त्याच ळी, शांततेचा तोडगा शोधला पाहिजे जेणेकरून तणाव आणखी वाढू नये, असे भारताचे प्रतिनिधी यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.


Guterres यांनी सैन्याचा निषेध केला


नागराज नायडू म्हणाले, 'आम्हाला सीमेवर कोणत्याही प्रकारचे तणाव नको आहे. म्हणून आपण यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे '. यापूर्वी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी गेल्या आठवड्यात म्यानमारच्या सैन्याने केलेल्या हिंसक कारवायांचा निषेध केला आहे. ते म्हणाले की लष्कराने आंदोलकांवर हल्ला करु नये आणि शांततेत समस्येवर तोडगा काढावा. विशेष म्हणजे सैन्य आणि पोलीस लोकशाही समर्थकांना सतत लक्ष्य करीत आहेत. हे योग्य नाही.