नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये India china सुरु असणारा सीमावाद काही केल्या मिटण्याचं नाव घेत नाही आहे. मुळ नियंत्रण रेषेपाशी सुरु असणारा दोन्ही दोशांमधील सैन्यांमध्ये सुरु असणारा संघर्ष दर दिवशी नवं वळण घेत आहे. त्यातच सूत्रांच्या माहितीनुसार चीनच्या सैन्याकडून भारतीय सैन्याप्रती रचली जाणारी कटकास्थानंही नवं रुप धारण करु लागली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला भारतीय सैनिकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी म्हणून चीनकडून LAC वर पंजाबी गाणी वाजवण्यात येत असल्याचं कळत आहे. पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या पँगाँग लेकपाशी असणाऱ्या फिंगर 4 क्षेत्रातील भागात चीनकडून लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये सतत पंजाबी गाणी वाजवण्यात येत आहेत. 


भारतीय सैन्याची एकंदर तयारी पाहता चीननं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय सैन्य फिंगर 4 जवळूनच चीनच्या सैन्यावर करडी नजर ठेवून आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ज्या पोस्टवर चीनकडून लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत तेथे चोवीस तास भारताकडून नजर ठेवली जात आहे. 


३८,००० चौरस किमी भूखंडावर ताबा 


केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह Union Defence Minister Rajnath Singh यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार चीननं लडाख परिसरातील जवळपास ३८००० चौरस किमी भूखंडावर अनधिकृत ताबा मिळवला आहे. जे द्विपक्षीय सामंजस्य कराराचं उल्लंघन आहे. चीनकडून मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आलेलं सैन्यबळही १९९३ आणि १९९६ च्या करारांचं उल्लंघन ठरत आहे. 


 


आतापर्यंत भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारी तणावाची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्रालय, मित्र राष्ट्र अशा सर्व मार्गांनी या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण, अनेक चर्चांनंतरही सीमेवर असणारी तणावाची परिस्थिती मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे.