लेह : पूर्व लडाखच्या पँगाँग त्सो लेकच्या भागात india china चीन आणि भारत या दोन्ही राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाल्यामुळं पुन्हा एकदा या दोन्ही राष्ट्रांच्या सीमावादाचा प्रश्न तणावग्रस्त वळणावर आला आहे. मुख्य म्हणजे दोन्ही राष्ट्रांमध्ये गलवान प्रकरणानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु असतानाच घडलेली ही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटवताना दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार २९ - ३० ऑगस्टच्या रात्री ही झडप होण्याच्या आधीच लडाखमध्ये चीनच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनकडून काही दिवसांपूर्वीच ladakh लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागामध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वायुदल तुकडीतून जे-20 ही फिफ्थ जनरेशन लढाऊ विमानं पुन्हा तैनात करण्यात आली होती. सद्यस्थितीलासुद्धा ही लढाऊ विमानं या भागात घिरट्या घालत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 


'PLAAF अर्थात चिनच्या सैन्याकडून होतान एअर बेसवर जे- 20 ही लढआऊ विमानं तैनात करण्यात आली होती. भारतीय हद्दीत येणाऱ्या लडाख आणि त्यानजीकच्या परिसरात ही विमानं घिरट्या घालत होती. याशिवाय अद्यापही अशाच हालचाली चीनकडून सुरु आहेत', अशी माहिती सरकारी सूत्रांनी एएनआयला दिली. 


 


भारतीय सैन्यामध्ये राफेल या लढाऊ विमानांचं बळ जोडलं गेल्यानंतर चीनकडूनही अद्ययावत तंत्र आणि ताकदीची ही लढाऊ विमानं सीमाभागात तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. होतान आणि गर गुनासा या दोन तळांसह इतरही तळांवरुन चीनच्या लढाऊ विमानांचं उड्डाणं भरण्याचं सत्र सुरु आहे. एकंदरच सीमाभागात दोन्ही राष्ट्रांकडून संरक्षणार्थ होणाऱ्या हालचालींना चांगलाच वेग आला असून परिस्थितीनं गंभीर वळण घेतल्याचं चिन्हं आहे.