नवी दिल्ली : अमेरिकेने बंदी घातल्यानंतर ही भारत आणि इराण यांच्यात आयात निर्यात सुरू आहे. भारत आणि इराण मध्ये भारतीय रुपयांमध्ये व्यवहार होण्याबाबत करार झाला. म्हणजे भारत कच्या तेलाच्या ऐवजी इराणला डॉलर नाही तर रुपयाच देणार आहे. पण अमेरिकेने इराणवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लावल्याने इराणमध्ये अन्न धण्याबाबत ही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता भारत इराणला कच्च्या तेलाच्या बदल्यात बासमती तांदूळ इराणला देणार आहे.


कच्च्या तेलाच्या मोबदल्यात रुपया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोव्हेंबर 2018 मध्ये अमेरिकेने इराणवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लावले होते. यामुळे इराण कसून तेल खरेदी करण्याऱ्या देशांपूढे मोठं संकट उभे राहिले होते. त्या दरम्यान भारतात देखील पेट्रोल आणि डिझेल चे दर वाढल्याने मोठं संकट तयार झालं होतं. पण भारताने अमेरिकेचे हे निर्बंध जुगारत इराण सोबत व्यवहार कायम ठेवले. पण ऊर्जा संकट पाहता अमेरिकेने भारतासह 7 देशांना या निर्बंधामधून बाहेर ठेवलं. पण भारतासमोर डॉलर मध्ये व्यवहार करण्याचं संकट होतच. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर च्या किमती देखील रुपयाच्या तुलनेत वाढत होत्या. पण शेवटी भारत रुपयामध्येच मोबदला देईल असा करार झाला.


मे 2018 मध्ये अमेरिकेने भारताला देखील इराण सोबत व्यवहार न करण्याचे आदेश दिले होते. पण नंतर वाढता दबाव आणि इतर काही गोष्टींमुळे अमेरिकेने 7 देशांना यातून वगळले.


यूको बँकेत जमा होतो पैसा


भारत इराण कडून कच्चं तेल खरेदी करतो तर इराणला धान्य, औषधं आणि मशीन निर्यात करतो. करारानुसार भारत तेलाचा मोबदला भारतीय रिफाइनरी कंपनी आणि नॅशनल ईरानियन ऑईल कंपनी (एनआयओसी) च्या यूको बँकेच्या खात्यात जमा करेल. भारतीय रुपया इराण शिवाय कोणत्य़ाच देशाच्या कामात येत नाही. त्यामुळे करारात असं ठरलं की, भारतातून इराणमध्ये निर्यात होणाऱ्य़ा वस्तूंच्या मोबदल्यात यूको बँकेत जमा होणाऱ्या रुपयांमधून इराण भारताला पैसे देईल.


कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात भारतात


कच्चं तेल आयात करण्याच्या बाबतीत भारत पहिल्या स्थानी आहे. भारत साऊदी अरब, इराक, नायजेरिया, वेनेजुएलाकडून तेल खरेदी करतो. भारतात एकूण १० ते १२ टक्के कच्च्या तेलाची आयात इराणमधून होते. मागच्या वर्षी भारताने इराणकडून जवळपास 7 अरब डॉलर कच्च्या तेलाची आयाकत केली. भारत इराणकडून मोठ्य़ा प्रमाणात शेतीसाठी लागणारे फर्टिलायजर देखील खरेदी करतो. इराणमधून भारतात ५,६०,००० बॅरेल कच्चं तेल प्रतिदिन आयात होतं. पण अमेरिकेने निर्बंध घातल्याने आयातचं प्रमाण कमी झालं आहे. २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत इराणकडून भारतात १८.४ मिलियन टन कच्चं तेल खरेदी केलं आहे.


इराणला बासमती तांदूळ होणार निर्यात


भारत बासमती तांदुळाच्या एकूण उत्पानापैकी ४० टक्के तांदूळ निर्यात करतो. यामध्ये इराणमध्ये सर्वाधिक तांदूळ निर्य़ात होतो. भारताने २०१५-१६ मध्ये इराणला ३७२३ कोटींचा ६.९५ लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ निर्यात केला. २०१७-१८ मध्ये ८.७७ लाख मेट्रिक टन (५८२९.७८ कोटी रुपये) चा तांदुळ निर्यात झाला.


इराणला भारतातून बासमती तांदूळ निर्णात होत असल्याने याचा फायदा भारतातील शेतकऱ्यांना होतो. ऑल इंडिया राइस एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष विजय सेतिया यांनी देखील या डीलवर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'याचा फायदा हा आहे की, निर्यातदारांना लगेचच याचा मोबदला मिळतो आणि ते पण भारतीय मुद्रामध्ये मिळतो. डॉलरचा दर वधारला किंवा घसरला तरी याचा निर्यातीवर परिणाम होत नाही.'