नवी दिल्ली : केंद्र सरकार नोटबंदी आणि इतर मार्गांनी भ्रष्टाचार कमी करण्याचा दावा करत आहे. मात्र, भ्रष्टाचार रोखण्यात मोदी सरकारला अद्याप यश आलेलं नाहीये असेच दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ब्सकडून आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भ्रष्ट देशांच्या या यादीत भारताचाही समावेश आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलकडून भ्रष्टाचारी देशांसंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते.


ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारत हा आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट देश असल्याचं म्हटलं आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताने व्हिएतनाम, पाकिस्तान आणि म्यानमार या देशांनाही मागे टाकले आहे.


भ्रष्टाचारविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या लढ्याचं फोर्ब्सने कौतुक केलं आहे. फोर्ब्सने म्हटलं आहे की, मोदींनी भ्रष्टाचाराविरोधात लढाईला सुरुवात केली आहे. ५३ टक्के लोकांना वाटतं की, मोदी योग्य करत आहेत.


भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण ६९ टक्के आहे. त्यांनतर व्हिएतनाममध्ये ६५ टक्के, पाकिस्तानात ४० टक्के असल्याचंही सर्वेक्षणात समोर आलं आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने १८ महिन्यांत १६ देशांतील २०,००० नागरिकांवर हे सर्वेक्षण केलं होतं.