Job News : शिक्षणाची पायरी ओलांडल्यानंतर प्रत्येकजण मनाजोग्या नोकरीच्या शोधात असतो. सरकारी असो वा खासगी, चांगल्या पगाराची, चांगल्या हुद्द्याची आणि चांगली जीवनशैली देणारी नोकरी प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. पण, भारतामध्ये मागील काही वर्षांमध्ये नोकरीची ही समीकरणं पुरती बदलली आहेत. यामागे काही महत्त्वाचे बदल कारणं असून काळानुरूप ही परिस्थिती आणखी गंभीर वळणावर येऊ शकते असंही म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडब्ल्यूसीच्या ग्लोबल सर्व्हेमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार यंदाच्या वर्षी देशात आणि जगभरात नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 2022 च्या 'द ग्रेट रेझिगनेशन'हूनही जास्त असणार आहे. सदर सर्व्हेक्षणानुसार भारतामध्ये नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जागतिक सरासरीहून दुपटीनं जास्त असेल. 


कुठे, किती टक्के कर्मचाऱ्यांना बदलायचीये नोकरी? 


वरील सर्व्हेक्षणामध्ये केलेल्या दाव्यानुसार यंदाच्या वर्षी 52 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी बदलण्याची च्छा आहे. त्यामागोमाग इजिप्तचं नाव येत असून, तिथं 46 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी बदलण्याची इच्छा आहे. तर, भारतात 43 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी बदलण्याची इच्छा आहे. येत्या काळात ही सरासरी कायम राहिल्यास 2024 च्या अखेरपर्यंत आणखी 28 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याची शक्यता आहे. 


हेसुद्धा वाचा : NASA कडून धोक्याची सूचना देणारा Video शेअर; संपूर्ण जगाची चिंता वाढली 


50 देशातील जवळपास 56 हजार कर्मचाऱ्यांनी या सर्व्हेक्षणात सहभागी होत आपली मतं मांडली. यामध्ये नोकरी बदलण्यासाठी सर्वात उत्सुक कर्मचारी अमेरिकेतून असल्याचं म्हटलं गेलं. भारतातही ही टक्केवारी कमी नसून, दर दुसऱ्या व्यक्तीला नोकरी बदलण्याची इच्छा असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या काळात असेल आणि वेल्थ मॅनेजमेंट अशा क्षेत्रांमधून सर्वाधिक कर्मचारी नोकरीत नवी झेप घेऊ इच्छितात. 


कर्मचाऱ्यांना का बदलायचीये नोकरी? 


सदर अहवालानुसार एआय चं कौशल्य नसल्यामुळं नोकरी सोडण्यास किंवा नोकरी बदलण्यास कर्मचारी भाग पडत आहेत. जवळपास 51 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना आपआपल्या क्षेत्रांमध्ये पुढील 5 वर्षांमध्ये वेगानं बदल होण्यची अपेक्षा असल्यामुळं ते नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. तर, 29 टक्के कर्मचारी मात्र आहेत त्याच ठिकाणी स्थिरस्थावर होण्याच्या विचारात आहेत. योग्य व्यक्तींना ओळखण्यात अपयश मिळाल्यामुळंही नोकरी बदलणारा वर्ग मोठा असून, ही एक महत्त्वाची बाब ठरत आहे.