मेघा कुचिक झी मीडिया, मुंबई : भारतातील बहुतांश मोबाईल युजर्सच्या हातात स्मार्टफोन आला आहे. २०१७ पासून भारतात स्मार्ट फोनचा वापर सुरु झाला. शिवाय इनंटरनेट डेटाही उपलब्ध झाला. त्यामुळं मोबाईल हाताळणारा प्रत्येकजण व्हिडिओ डाऊनलोड आणि अपलोड करू लागला. त्यात टिकटॉक आणि व्हॉट्सऍपमुळं इंटरनेटचा वापर जास्त वाढला. एका आकडेवारीनुसार २०१४ मध्ये भारतात अवघा ८१ कोटी जीबी इंटरनेट डेटाचा वापर झाला होता. तोच वापर वाढून २०१९ मध्ये तब्बल ५ हजार ४९१ कोटी जीबी एवढा इंटरनेट डेटा वापरला गेला. मोबाईल कंपन्यांनी सुरुवातीला स्वस्त डेटा देऊ केला. आता त्यांनी डेटाच्या किंमती वाढवल्या आहेत. तरीही भारतीयांचं डेटा वापरणं कमी झालेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगात इंटरनेट वापरात चीन अव्वल आहे. त्यानंतर इंटरनेट वापरात भारतीयांचा क्रमांक लागतो. जगात ३ पूर्णांक ८ अब्ज लोक इंटरनेट वापरतात. त्यापैकी ६६ कोटी भारतीय आहेत. भारतीय इंटरनेटशिवाय राहू शकत नाही असं तज्ज्ञांनाही वाटू लागलं आहे.तरुणाईसाठीही सबकुछ मोबाईल झालाय. त्यामुळं मोबाईल आणि इंटरनेटशिवाय कसं होणार असं तरुणाईला वाटतं. 


भारतीयांचं मोबाईलवेड हे सर्वश्रूत आहे त्यामुळंच भारत जगातली सर्वात मोठी मोबाईलची बाजारपेठ झाली आहे. जगातील सगळ्या आघाडीच्या मोबाईल कंपन्या भारतात आपला फोन लाँच करण्यासाठी उत्सुक असतात. भारतीयांचा डेटा वापराची गती पाहता येत्या काळात भारतीय चीनलाही डेटावापरात मागं टाकतील यात शंका नाही.