वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यात ‘बेका’ या महत्त्वाचा संरक्षण करार झाला. चर्चेत दोन्ही देशातील संरक्षण संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला. काल दोन्ही देशाच्या मंत्र्यांमध्ये 'टू प्लस टू' बैठक झाली. यावेळी पाच मोठे करार करण्यात आले. या कराराअंतर्गत अमेरिका संरक्षण दृष्ट्या संवेदनशील आणि महत्वाची माहिती भारतासोबत शेअर करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिका आणि भारताचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यात दिल्लीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा ‘बेका’ (BECA) करार केला. या करारामुळे दोन देशांमधले लष्करी संबंध मजबूत होणार आहेत. अमेरिका आणि भारतादरम्यान वृद्धिंगत होत असलेल्या संबंधांमुळे चीनची चिंता वाढली आहे. 


अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर आणि परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या बैठकीआधी अमेरिकेच्या दोन्ही मंत्र्यांशी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनीही चर्चा केली.