गलवान : भारत-चीन यांच्यातील सीमा वादानंतर तणाव वाढला आहे. चीनने सीमेवर सैन्याची जमवाजमव केल्यानंतर भारताने आपली ताकद दाखविण्याची एकही संधी सोडलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर चीनने दोन किमी पर्यंतचे सैन्य माघारी घेतले आहे. गलवान खोऱ्यात चीनकडून हिंसक झडप टाकण्यात आली. यात भारतीय २० जवान शहीद झालेत. त्याचवेळी भारताने प्रत्त्युर देताना जवळपास चीनचे ४२ जवान मारण्यात यश आले. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान बोलणी सुरु झाली असताना चीनकडून सीमेवर सैन्य तैन्यात करण्यात येत होते. आता भारताने सीमेवर रात्रीही कडक पहारा देण्यास सुरुवात केली आहे. अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे.



भारत-चीन सीमेवर रात्री अपाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. असे वृत्त एएआयने दिले आहे. त्याबाबत ट्विट करत फोटो शेअर केले आहेत. अंधारात सीमेवर काम करताना लक्ष ठेवणे कठिण काम आहे. अशा परिस्थितीत भारतीय जवान कार्यरत असून लक्ष ठेवत आहे. अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. बेसावध असताना चीन सैन्याकडून रात्रीची हिंसक झडप घालण्यात आली होती. आता भारताने तणावानंतर रात्रीचे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. शत्रूचा हल्ला रात्रीही परतवू लावण्यासाठी हा कडक पाहारा देण्यात येत आहे.



लडाख पूर्व भागातील गलवान खोऱ्यात भारतीय वीर जवानांनी बाजी लावत सीमेचे रक्षण केले. या घटनेनंतरही भारत-चीन सीमेवर मोठा तणावआहे. चीनने सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, चीनचा आधीचा डाव लक्षात घेता भारताकडून खबरदारी घेण्यात येत आहे. सीमेवर रात्रीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. या अत्याधुनिक हेलिकॉप्टरची दोन मिनिटांत १२०० राऊंड फायर करण्याची क्षमता आहे.