चुकीच्या वेळी इंजेक्शन दिल्याने डॉक्टरने नर्सचा गळा दाबला
देव आणि डॉक्टर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं बोललं जातं. देवानंतर डॉक्टरांचे नाव घेतले जाते. मृत्यूच्या दारातून जिंवत आणण्याची ताकद डॉक्टरांमध्ये असते. अशाच एका डॉक्टराने एक विचित्र प्रकार केल्याचा प्रकार अमेरिकेत समोर आला आहे.
वॉशिंग्टन : देव आणि डॉक्टर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं बोललं जातं. देवानंतर डॉक्टरांचे नाव घेतले जाते. मृत्यूच्या दारातून जिंवत आणण्याची ताकद डॉक्टरांमध्ये असते. अशाच एका डॉक्टराने एक विचित्र प्रकार केल्याचा प्रकार अमेरिकेत समोर आला आहे.
रुग्णाला चुकीच्या वेळेला इंजेक्शन दिल्याने एक डॉक्टर आपल्याच रुग्णालयातील नर्सवर चांगलाच संतापला. इतकचं नाही तर यापुढे जे काही झालं ते खूपच विचित्र होतं.
रुग्णाला चुकीच्या वेळी इंजेक्शन दिल्याने संतापलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकी डॉक्टरने चक्क आपल्याच नर्सचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला आहे.
चुकीच्या वेळी दिलं इंजेक्शन
न्यूयॉर्कस्थित नासाऊ युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये वजन कमी करण्यासाठी मदत करणाऱ्या डॉक्टरवर नर्सला मारण्याचा आरोप करण्यात येत आहे. आरोपी डॉक्टरने ५१ वर्षीय नर्सचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. पीडित नर्सने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चुकीच्या वेळी इंजेक्शन दिल्याने डॉक्टर संतापला आणि त्याने मारण्याचा प्रयत्न केला.
डॉक्टरने आरोप फेटाळले
पोलिसांनी सांगितले की, व्यंकटेश सास्तकोणार (४४) ने आपल्या वकीलामार्फत हे सर्व आरोप फेटाळले आहे. तसेच २२ जानेवारी रोजी तसं काहीच घडलं नव्हतं. झालेल्या घटनेला रंगवून सादर करण्यात येत आहे.
'मी तुझी हत्या करु शकतो'
नर्सने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सस्तकोणार नर्सच्या मागे आला आणि त्याने आपल्या शर्टमधून इलास्टिक काढून नर्सचा गळा दाबला. यामुळे नर्सला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर डॉक्टरने नर्सला धमकावत म्हटलं की, "असं केल्यामुळे मी तुझी हत्याही करु शकतो".
या घटनेनंतर नासाऊ युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधून सर्जनला निलंबित करण्यात आलं आहे. त्याला ३,५०० डॉलरच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.