अमेरिकेत पोलिसांच्या फायरिंगमध्ये मुळच्या भारतीय युवकाचा मृत्यू
मुळच्या भारतीय युवकाला केलं ठार
नवी दिल्ली : अमेरिकेतील कॅलिफॉर्निया पोलिसांनी पिस्तूल बाळगलं म्हणून मुळचा भारतीय असलेल्या युवकाला ठार केलं आहे. या युवकाने आधी पोलिसांवर फायर केलं. त्यानंतर पोलिसांनी याविरुद्ध कारवाई करत या युवकाला ठार केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 वर्षीय नाथनील प्रसाद हा युवक पिस्तूलसह आढळला होता. 5 एप्रिलला ही कारवाई केली गेली होती. ज्यामध्ये या युवकाचा मृत्यू झाला आहे. या युवकावर आधीच एक आरोप होता. 22 मार्चला अटकेपासून वाचण्यासाठी तो फरार झाला होता.