भारतीय ज्योतीषाने आणला `पाक`च्या नाकात दम
नोव्हेंबरच्या अखेरीस `पाक`मध्ये दहशतवादी हल्ले होऊ शकतील असे ट्वीट या ज्योतिषाने ऑक्टोबरमध्ये केले होते.
मुंबई : भारताच्या ज्योतीषाने केलेले ट्वीट पाकिस्तानच्या खासदारांसाठी त्रासाचे कारण ठरले आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस 'पाक'मध्ये दहशतवादी हल्ले होऊ शकतील असे ट्वीट या ज्योतिषाने ऑक्टोबरमध्ये केले होते.
एक दिवसाचा फरक
गेल्या शुक्रवारी (१ डिसेंबर) ला पाकिस्तानातील पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. केवळ एका दिवसाचा फरक या ट्विट आणि हल्ल्यात होता.
खासदारांना हूरहूर
या गोष्टीची चिंता पाकच्या खासदारांना लागली असतानाच या स्वघोषीत ज्योतिषाने अजून एक भविष्यवाणी केली आहे.फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पाकिस्तानात ५ मोठे दहशतवादी हल्ले होऊ शकतात असे त्याने म्हटले आहे.
पाकमधील हल्ल्यात भारतीय गुप्तचर संस्थाचा हात असल्याचे पाकिस्तानी खासदारांना वाटत आहे.
ज्योतिषाचे ट्वीट
१३ ऑक्टोबरला अनिरुद्ध कुमार मिश्रा यांच्या ट्विटर हॅंडल @Anirudh_Astroवरून ट्वीट गेल, पाकिस्तानात नोव्हेंबर पर्यंत हल्ला होऊ शकतो. यामध्ये ज्याोतिषाने पाकिस्तान वर्तमानपत्र 'डॉन'लाही टॅग केले होते.
पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अनिरुद्ध ने पुन्हा ट्वीट करुन सांगितले की, ही भविष्यवाणी एका दिवसांनी चुकली आहे.
पाकला पडला प्रश्न
एक भारतीय अशी भविष्यवाणी कशी करु शकतो ? आणि ती अचूक कशी होऊ शकते ? असे पाकिस्तानात सिनेटर्सच्या एक पॅनलने देशाच्या गृह मंत्रालयाला विचारले.