वडिलांच्या हत्येचा कट रचणाऱ्या किशोरवयीन मुलाला अटक...
ब्रिटनमध्ये एका भारतीय वंशाच्या किशोरवयीन मुलाला आठ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
लंडन : ब्रिटनमध्ये एका भारतीय वंशाच्या किशोरवयीन मुलाला आठ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा मुलगा चक्क आपल्या वडिलांच्या हत्येचा कट रचत होता.
म्हणून उचलले टोकाचे पाऊल
त्यासाठी त्याने ऑनलाईन विस्फोटक खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याली ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वडिल त्याच्यासोबत असलेले नाते स्विकारण्यास नकार देत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
१९ वर्षीय आरोपीला अटक
ब्रिटेनच्या राष्ट्रीय अपराध एजेंसीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात गुरतेज सिंग रंधावाला अटक करण्यात आली आहे, आरोपी मुलाने कार बॉम्ब ऑर्डर केला होता मात्र अधिकाऱ्यांनी डिलीव्हरीपूर्वी तिथे डमी बॉम्ब ठेवला.
बर्मिघम क्राऊन कोर्टात नोव्हेंबर २०१७ मध्ये या १९ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. इतरांचे जीव धोक्यात घातल्याने आणि विस्फोटक ऑर्डर केल्याप्रकरणी त्याच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला.