Indian Railway : केवळ 12.50 रुपयांत भारतातून या देशात रेल्वे प्रवास, पाहा वेळापत्रक
Indian Railway News : तुम्ही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये (Summer Vacation) फिरण्याचा प्लान करत असाल तर Good News आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) मोठी घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : Indian Railway News : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा झाल्या आहेत. शालेय परीक्षा आजपासून सुरु झाल्या आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याचा अखेरीस आणि मे महिन्यात तुम्ही फिरण्याचा बेत करत असला तर ही तुमच्यासाठी बातमी चांगली आहे. तुम्ही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये (Summer Vacation) नेपाळला (Nepal Tour) जाण्याचा प्लान करत असाल तर Good News आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) मोठी घोषणा करण्यात आली आहे.
भारतातून नेपाळमध्ये (India to Nepal) जाण्यासाठी दोन रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा (Nepals PM Sher Bahadur Deuba) यांनी या रेल्वेचे उद्घाटन केले आहे. विशेष म्हणजे फक्त 12.50 रुपयांत रेल्वेने भारतातून नेपाळमध्ये जाता येणार आहे. भारतीय रेल्वेने याचे टाईमटेबल जाहीर केलं आहे.
भारतातून आता नेपाळला जाणे आता अधिक सोपे झाले आहे. जयनगर ते कुर्था ही लक्झरी रेल्वे सेवा तब्बल आठ वर्षांनंतर सुरू झाली आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी गेल्या रविवारपासून ही रेल्वे सुरु झाली आहे. दररोज सकाळी 8 वाजून 15 मिनिटे आणि दुपारी 2 वाजून 45 मिनिटांला गाडी जयनगर स्टेशनवरून सुटणार आहे. दिवसभरात रेल्वेच्या दोन फेऱ्या होतील, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
ही रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे भारतातून नेपाळला जाण्यासाठी केवळ 12.50 रुपये मोजावे लागणार आहेत. जयनगर आणि कुर्था दरम्यान एकूण 7 स्थानके आहेत. दुसरीकडे, खजुरीला जाण्यासाठी 15.60 रुपये, महिनाथपूरला जाण्यासाठी 21.87 रुपये, वैदेहीला जाण्यासाठी 28.12 रुपये, 34.00 रुपये, जनकपूरला 43.75 रुपये आणि कुर्थाला जाण्यासाठी 56.25 रुपये मोजावे लागतील.