वॉशिंग्टन : भारताच्या  74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर Times Square शनिवारी तिरंगा फडकवण्यात आला. या प्रसिद्ध ठिकाणी प्रथमच भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. न्यूयॉर्कमध्ये भारताचे वाणिज्य जनरल Consul General of India रणधीर जयस्वाल Randhir Jaiswal यांनी टाईम्स स्क्वेअरवर ध्वजारोहण केलं. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या भारताच्या निर्मितीसाठी एक रोडमॅप तयार केला असून आम्ही त्याच चौकटीत देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असं रणधीर जयस्वाल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. 



दुसरीकडे, कॅनडाच्या टोरंटोमधूनही तिरंग्याच्या रंगातील Niagara Fallsचे काही फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले. दुबईतील Burj Khalifaवरही तिरंगा पाहायला मिळाला.





अमेरिकेव्यतिरिक्त जगातील विविध भागात राहणाऱ्या भारतीयांनी तिरंगा फडकवून आणि राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत गाऊन भारताचा 74वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.