जिनिव्हा (स्वित्झर्लंड) : भारतात कोरोना विषाणूचा (Coronavirus in India) हाहाकार दिसून येत आहे. कोरोना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. आता कोविड-19चा नवा स्ट्रेन प्रथम भारतात  (Indian Variant) आढळला. आता हा नवा स्ट्रेन जगभरातील अन्य देशांमध्ये पसरु लागला. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी सांगितले की, भारतातील कोरोनाचा नवा प्रकार ज्याच्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आता हा कोरोनाचा ना व्हेरिएंट 44 देशांत पोहोचला. 


44 देशांमध्ये सापडला कोरोनाचा भारतीय स्ट्रेन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक आरोग्य संघटनेने  (WHO)म्हटले आहे की, कोरोनाचा  B.1.617 व्हेरिएंट हा प्रकार मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात सापडला होता. आतापर्यंत 4500 पेक्षा जास्त नमुन्यांमध्ये भारतीय व्हेरिएंट  (Indian Variant)  सापडले आहे.


भारताबाहेर ब्रिटनमध्ये सर्वाधिक प्रकार


कोरोना विषाणूचा भारतीय प्रकार  (Indian Variant) हा भारताबाहेरील ब्रिटनमध्ये सर्वाधिक प्रमाणात सापडला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने B.1.617 जाहीर केले. आपल्या म्यूटेशन आणि वैशिष्ट्यांमुळे चिंतेचा विषय झाला आहे.  म्हणूनच, प्रथम ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत कोविड-19 च्या इतर तीन प्रकारांच्या व्हेरिएंट मधील सूचित त्याला समाविष्ट केले गेले आहे.


अधिक संसर्गजन्य भारतीय व्हेरिएंट


भारताच्या या नवीन प्रकाराला वैज्ञानिकदृष्ट्या B.1.617 असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये दोन प्रकारचे म्यूटेशन्स (E484Q आणि L452R) आहेत. हा  व्हायरसचा एक प्रकार आहे. ज्याचा जीनोम दोनदा बदलला आहे. E484Q आणि L452R च्या मिश्रणाने भारतात पसरलेला डबल म्यूटेंट विषाणू बनलेला आहे. L452R स्ट्रेन अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये आढळला. तर E484Q स्ट्रेन भारतात आढळला. हा प्रकार अधिक संसर्गजन्य आहे आणि वेगाने पसरतो.


 भारतात 348421 नवीन कोरोना बाधित


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या 24 तासांत 3 लाख 48 हजार 421 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, तर या काळात 4205 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, भारतात कोरोना विषाणूची लागण होणारी एकूण संख्या 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 वर गेली आहे. तर 2 लाख 54 हजार 197 लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या 24 तासात 3 लाख 55 हजार 338 लोक बरे झाले आहेत, त्यानंतर कोविड -19 मधून बरे होणाऱ्यांची संख्या 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 झाली आहे. यासह, देशभरात सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली आहे.  (Coronavirus Active Cases in India) आणि देशभरात 37 लाख 4 हजार 99 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.