न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात आईसीजे मध्ये भारताच्या दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदा न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनच्या ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीत दलवीर यांनी हा विजय मिळवला. दलवीर भंडारी यांच्या या यशानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हा आनंद ट्विट करत व्यक्त केला, वंदे मातरम आंतराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये भारताचा विजय जय हिंद असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलंय.





१९४५ साली स्थानप करण्यात आलेल्या आईसीजेमध्ये पहिल्यांदाच असेल झाले आहे की, यात कुणीही ब्रिटीश न्यायाधीश नसेल.