मुंबई : भारतात तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं असेल की, आपल्या श्रीमंतांसोबत गरीब लोक देखील पाहायला मिळतात. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की, बाहेरगावच्या देशात देखील गरीब लोक असतात का? अमेरिकेत सगळे श्रीमंत लोक राहातात, मग तेथे गरीब लोक असतात? तर याचं उत्तर हो आहे. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. जिथे चांगलं असतं तिथे वाईट देखील असतं. तसंच जिथे श्रीमंती असते तिथे गरीबी देखील असतेच. त्यामुळे सहाजिकच अमेरीकेत देखील गरीबी आहेच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता प्रश्न हा राहातो की, मग येथील गरीब लोक राहातात कुठे? कारण भारताती गरीब लोक तर रस्त्याच्या किंवा स्टेशनच्या कडेला राहातात. परंतु अमेरिकेला तर आपल्याला मोठे आणि साफ रस्ते दिसतात. मग येथील गरीब लोक कुठे राहातात?


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल परंतु, अमेरिकेतही भारतासारखी परिस्थीती आहे. अमेरिकेत देखील बेघर लोक आहेत, ज्यांना राहण्यासाठी घर नाही. पण, ज्यांच्याकडे घर नाही ते लोक अमेरिकेत कुठे राहतात?


अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, बेघर लोकांच्या संख्येत अमेरिकेची काय स्थिती आहे आणि किती लोक घराशिवाय राहतात. बेघर लोकांच्या संख्येसोबतच, त्यांच्या राहण्याची व्यवस्था काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो…


येथे किती बेघर लोक आहेत?


आम्ही तुम्हाला सांगतो की, अमेरिकेत अनेक बेघर लोक आहेत, ज्यांना आपलं डोकं लपवायला कायमची जागा नाही.


अशा लोकांच्या संख्येबद्दल बोलायचे झाले, तर अमेरिकेत या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. अहवालानुसार, अमेरिकेत बेघर लोकांची एकूण संख्या 2 लाख 26 हजार आहे. यातील बहुतांश लोक एकटे राहतात आणि त्यांची संख्या 2 लाख 9 हजारांच्या जवळपास आहे.


त्याच वेळी, सुमारे 17 हजार लोक आहेत जे संपूर्ण कुटुंबासह आहेत. याचा अर्थ ते कुटुंबासह राहतात आणि संपूर्ण कुटुंबाला राहण्यासाठी जागा नाही. आता प्रश्न असा आहे की इतके लाखो लोक अमेरिकेत कसे राहतात?


येथे बेघर लोक कसे जगतात?


DW ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील लाखो लोक ज्यांच्याकडे घरे नाहीत, ते कधी रस्त्यावर, कधी तंबूत राहातात. तसेच ते कधी कार आणि पार्किंगमध्ये राहतात. कोरोना महामारीनंतर अशा लोकांची संख्या वाढली आहे आणि आता अशा लोकांची संख्या मोठी आहे. ज्यांना राहण्यासाठी जागा नाही.


यासाठी अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी तंबूंची व्यवस्था करण्यात आली आहेत, तर काही छावण्याही करण्यात आल्या आहेत.


त्यांच्यासाठी तंबूची व्यवस्था करणार्‍यांचे म्हणणे आहे की, त्यांना राहण्यासाठी जागा मिळते आणि तंबूत स्वच्छपणे राहण्याची व्यवस्था केली जाते. मात्र, याला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, लोकांना छावणीत ठेवणे म्हणजे गुन्हेगारासारखे आहे. तसे, या छावण्यांमध्ये कचरा, साफसफाई आदींची व्यवस्था आहे. मात्र, आता अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये या छावण्यांविरोधात कायदा आला असून, त्यानंतर ते हटवण्यात येणार आहेत.