केवळ ५०० रुपयांत बनतं इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स
तुम्ही फिरायला परदेशात गेलात तर गाडी चालवता येत असूनही केवळ त्या देशातील वाहन चालवण्याचा परवाना नाही म्हणून तुम्हाला ड्रायव्हिंगचा नाद सोडावा लागला असेल... होय ना... अशाच व्यक्तींसाठी ही महत्त्वाची माहिती आहे.
मुंबई : तुम्ही फिरायला परदेशात गेलात तर गाडी चालवता येत असूनही केवळ त्या देशातील वाहन चालवण्याचा परवाना नाही म्हणून तुम्हाला ड्रायव्हिंगचा नाद सोडावा लागला असेल... होय ना... अशाच व्यक्तींसाठी ही महत्त्वाची माहिती आहे.
'इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायनन्स'बद्दल तुम्ही कधी ऐकलंत का? नसेल तर जरुर माहीत करून घ्या... हे लायसन्स काढल्यानंतर तुम्ही जगातील बहुतेक देशांत हे लायसन्स वापरू शकता... आणि ड्रायव्हिंगही करू शकता. यासाठी फी म्हणून तुम्हाला केवळ ५०० रुपये भरावे लागतात. फिरण्यासाठी किंवा कामानिमित्तानं अनेकदा परदेशाची सफर करणाऱ्या व्यक्तींसाठी हे लायसन्स फायदेशीर ठरतं.
हे लायसन्स काढण्यासाठी काय कराल!
- ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर याबद्दलची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. हे लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला त्याच गोष्टी करायच्यात ज्या तुम्ही स्थानिक लायसन्स काढण्यासाठी केल्यात.
- यासाठी तुम्हाला स्थानिक आरटीओमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल आणि जरुरी डॉक्युमेंटस सादर करावे लागतील
- सर्वात अगोदर तुम्हाला ४ए फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म ट्रान्सपोर्ट विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. याला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट म्हटलं जातं
- हा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रं जोडून आरटीओ ऑफिसमध्ये हा फॉर्म जमा करावा
- हे परमिट ऑनलाईन रिन्यूही करता येतं
आवश्यक कागदपत्रं (अटेस्टेड कॉपी)
- ड्रायव्हिंग लायसन्सची
- राहण्याचा पत्ता
- व्हॅलिड पासपोर्ट
- व्हॅलिड व्हिजा
- विमानप्रवासाचं तिकीट
- पाच पासपोर्ट साईज फोटो
- मेडिकल फॉर्म १-ए
- भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र (आधार कार्ड)
- जन्माचा दाखला