मुंबई : जगातील सर्वात मोठ्या वेबसाइट्स क्रॅश झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या यादीमध्ये क्रॅश झालेल्या वेबसाइट्समध्ये Reddit, Spotify, Twitch, Stack Overflow, GitHub, gov.uk आणि द गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी, फायनान्शियल टाईम्स यासारख्या असंख्य लोकप्रिय वेबसाइट्स आहेत. ज्यांना आउटेजला सामोरे जावे लागले आहे. सहसा हे एखाद्या महत्त्वपूर्ण इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रोवायडरमुळे घडते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये न्यूयॉर्क टाइम्सची प्रसिद्ध मीडिया कंपनी आणि यूके सरकारच्या वेबसाइटचाही समावेश आहे. या वेबसाइट लोड होत नाहीत आणि यूझर्सना त्या वापरताना त्रुटी येत आहेत. मीडिया वेबसाइट इंडिपेंडेंटवर ही या आउटेजचा परिणाम झाला आहे. वेबसाइट उघडताना त्रुटी कोड 503 दर्शवित आहे.


असे म्हंटले जात आहे की, क्लाऊड कंप्यूटिंग कंपनी फास्टली या वेबसाइटना सेवा प्रदान केल्यामुळे ही समस्या आली आहे.


कंटेंट डिलीवरी नेटवर्क  (सीडीएन) इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चरचा फास्टली हा एक महत्त्वाचा भाग आहे. या कंपन्या वेब सर्व्हिसेसची कार्यक्षमता आणि उपलब्धता सुधारण्यासाठी ग्लोबल सर्व्हरचे नेटवर्क चालवतात.


टेक क्रंचने फायनान्शियल टाईम्सच्या कर्मचाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, कंटेंट डिलीवरी नेटवर्क  (सीडीएन) प्रदात्यामुळे ही समस्या आली आहे.


सीडीएन प्रॉक्सी सर्व्हर म्हणून काम करतात आणि शक्य तितक्या शेवटच्या यूझर्सचा काही डेटा Cacheकरतात. उदाहरणार्थ, मीडिया सामग्री बर्‍याचदा आपल्या जवळच्या सीडीएन सर्व्हरवर Cache केली जाते. जेणेकरून जेव्हा एखादा यूझर वेब पेज लोड करतो, तेव्हा त्याला मूळ सर्व्हरवर जाण्याची आवश्यकता नसते.


कालांतराने, सीडीएनंनी आणखी फीचर जोडण्यास सुरवात केली. लोड बॅलेंसिंग, DDoS प्रोटेक्शन, वेब ऐप्लिकेशन, फायरवॉल्स असे बरेच सिक्योरिटी फीचर्सही त्यानी जोडण्यास सुरवात केली. लोकप्रिय सीडीएनमध्ये फास्टली, क्लाउडफ्लेअर, अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसवरील क्लाऊडफ्रंट आणि Akamai यांचा समावेश आहे. मीडिया वेबसाइटसह Fastlyखूप प्रसिद्ध आहे. परंतु या फास्टलीमुळे अनेक वेबसाइट्सला सध्या फटका बसला आहे.


खालील वेबसाइट्स सध्या काम करत नाहीत


टेक ओव्हर, रेडिट, गिटहब, कोरा, ऍमेझोन वेब सर्विस, शोपिफाई, ट्वीटर, ऍमेझोन व्हीडिओ, गगूल, स्पॉटीफाय, गगूल ड्राइव, मेगा, एयरेटल, पेपाल, यूट्यूब, स्पीडटेस्ट, फ्रीफायर, इंस्टाग्राम, वोडाफोन, गूगल मीट, जियो, गगूल मॅप्स, एक्साइटेल, बीएसएनएल, वॉट्सऍप, लाइन, हूलू, जीमेल, नेटफ्लिक्स, एक्ट, आइडिया, स्टीम.