Hamas Attack On Israel : पॅलेस्टाईनमधील सर्वात मोठी दहशतवादी संघटना हमासने (Hamas) इस्राईलवर रॉकेट हल्ला केलाय. मध्य आणि दक्षिण इस्राईलच्या काही भागात हे रॉकेट हल्ले (Rocket Attack) करण्यात आलेत. गाझा पट्टी भागातून जवळपास 5000 रॉकेटचा मारा करण्यात आला. या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणत हानी इस्राईलमध्ये (Israel News) झालीय. या हल्ल्यांनंतर इस्राईलनेही गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे आता गाझा पट्टीत पुन्हा अशांतता पसरल्याचं पहायला मिळतंय. यंदाचा वाद हा युद्ध असल्याचं इस्रायली पंतप्रधानांनी जाहीर केलंय. मात्र, या संपूर्ण प्रकरणात इस्राईलची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच मोसाद (Mossad) फेल गेल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हमासने गाझा पट्टीत जवळपास 20 मिनिटात 5000 रॉकेट हल्ले चढवले. लष्कराची वाहनं ताब्यात घेतली आहे. काही वर्षापूर्वी कंगाल झालेल्या हमासकडे इतकी शस्त्रास्त्रे कुठून आली? हमासचा प्लॅन मोसादच्या हातात का लागला नाही? असा सवाल विचारला जातोय. अनेक इस्रायली गुप्तचर संस्था पॅलेस्टाईनच्या विविध भागात कार्यरत आहेत. यामध्ये लष्करी गुप्तचर संचालनालय, शिन बेट आणि काही बाबतीत मोसादने हात पाय पसरले आहेत.


मोसाद ही जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर संस्था मानली जाते. माहिती काढण्याबरोबरच शत्रूंना संपवण्याचं काम देखील मोसाद करतं. मोसादने जगभरातील इस्रायलच्या शत्रूंना शोधून मारलंय. एवढंच नाही तर जे काम अमेरिकेलाही करता आलं नाही ते मोसादने केलंय. इस्रायली सैन्याच्या तुलनेत, हमास ही एक कमकुवत आणि अव्यवस्थित संघटना आहे, ज्यामुळे मोसादला आतील माहिती काढणं सोपं होतं.


मोसाद का ठरली फेल?


इस्राईलवर हल्ला करण्याची माहिती खूप कमी लोकांना माहित होती. इस्राईलची मैदानावरील सुरक्षाही अत्यंत कडक आहे. गाझा आणि इस्रायलमधील सीमेवर कॅमेरे, ग्राउंड मोशन सेन्सर्स आणि सतत सैन्य गस्त सह, मजबूत कुंपण आहे. भिंतींवर काटेरी तारा आहेत जेथे या वेळी झालेल्या घुसखोरीची शक्यता कमी झाली आहे. मात्र, हमासच्या सैनिकांनी बुलडोझरच्या सहाय्याने या भिंती पाडल्या, तारा कापून समुद्रमार्गे आणि पॅराग्लायडर्सच्या मदतीने इस्रायलमध्ये प्रवेश केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्राईलचं सैन्य कमी पडलं, अशी प्राथमिक माहिती रॉयटर या वृत्तसंस्थेने दिली आहे.


हमासला पैसा कुठून मिळतो?


हमासला प्रामुख्याने इस्लामिक देशांकडून पैसा मिळतो. यामध्ये सर्वात मोठा देणगीदार देश कतार आहे. याशिवाय पॅलेस्टाईनच्या विकासासाठी मिळालेला पैसाही हमास आपल्या कामासाठी वापरतो. हमासला हा पैसा सौदी अरेबिया, इराण आणि इतर अरब देशांकडून मिळतो. पाकिस्तानही हमासला अप्रत्यक्षपणे मदत करतो. पाकिस्तानी लष्कर हमासच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षणही देत असल्याच्या अनेक बातम्या आहेत.