मुंबई : इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये पाकिस्तानचे नेते ही त्यात उडी मारण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानने सध्या तुर्कींसोबत कट रचण्यास देखील सुरुवात केली आहे. या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन पाकिस्तानमधील एका मौलाना खासदाराने नॅशनल असेंब्लीमध्ये जिहाद विषयी बोलताना इस्त्राईल आणि भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी पॅलेस्टाईनच्या बहाण्याने तुर्कीला पोहोचले. तेथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगन यांची भेट घेतली. तेव्हा नॅशनल असेंब्लीमध्ये पाकिस्तानी खासदार मौलाना चित्रली यांनी सरकारला सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहाता इस्राईलविरोधात जिहाद करणे हा एकच तोडगा आहे.


बॉम्ब काय म्यूझियममध्ये ठेवायचे आहेत?


मौलाना चित्रली यांनी पाकिस्तानी संसदेत जोरजोरात ओरडून सगळ्यांना सांगितले की, पॅलेस्टाईन आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पाक सरकारने मिसाईल आणि अणुबॉम्बचा वापर करावा. मौलाना म्हणाले, "आम्ही संग्रहालयात ठेवण्यासाठी अणुबॉम्ब बनवले आहेत का? जर आपण पॅलेस्टाईन आणि काश्मीर मुक्त करू शकत नाही तर मग मिसाईल, अणुबॉम्ब आणि मोठ्या सैन्याची काय गरज आहे."



पॅलेस्टाईन आणि इस्त्राईलमधील युद्धामध्ये पाकिस्तान आणि तुर्की आपला स्वत:चा फायदा पाहात आहे. स्वतः कंगाल असलेल्या पाकिस्तानने आता युद्धासाठी पॅलेस्टाईनला आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने सोशल मीडियावर मौलाना चित्रालीचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.