इस्राईलमध्ये मोदी ज्या हॉटेलमध्ये थांबलेत ते आहे खास
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्राईल दौऱ्यावर आहेत. ते जरूसलमच्या किंग डेविड होटलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलचे मालक म्हणतात की भारतीय पंतप्रधान यावेळी जगाची कोणताही काळजी न करता सर्व चिंता सोडून येथे आराम करु शकतात.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्राईल दौऱ्यावर आहेत. ते जरूसलमच्या किंग डेविड होटलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलचे मालक म्हणतात की भारतीय पंतप्रधान यावेळी जगाची कोणताही काळजी न करता सर्व चिंता सोडून येथे आराम करु शकतात.
इस्राईलमध्ये पीएम मोदी जेथे थांबले आहेत तो जगातील सर्वात सुरक्षित हॉटेल आहे. मोदी सुरक्षेची कोणतीही चिंता न करता तेथे आराम करु शकतात म्हणून इस्राईलने या हॉटेलची निवड केली आहे.
पीएम मोदींच्या जेवणाची खास व्यवस्था
मोदी शाकाहारी असल्याने हॉटेलने याची खास व्यवस्था केली आहे की, मोदींच्या रुममध्ये कुकीज देखील एगलेस आणि शुगरलेस आहेत. रुपमधील पुष्पगुच्छ देखील भारतीय प्रतिनिधीमंडळाच्या आवडीने ठेवण्यात आले आहेत. मोदींच्या रुममध्ये वेगळं किचन आहे. तेथे सगळ्या गोष्टी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कारण मोदींनी जर कोणतीही डिश मागितली तर त्यांना ते लगेच उपलब्ध करुण देता येईल.
पीएम मोदींना ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे के इस्राईलमधील सर्वात सुरक्षित हॉटेल आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याची शक्यता नाही. हॉटेलचे संचालक शेल्डन रिट्ज यांनी म्हटलं की, बॉम्ब हल्ला, केमिकल हल्ला या सारख्या कोणत्याही हल्ल्यापासून हे हॉटेल सुरक्षित आहे.