Man On Earth : फक्त पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व; NASA च्या वैज्ञानिकाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ
Man On Other Planets : पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक टाईम ट्र्रॅव्हलर तसेच संशोधक एलियन्सबाबत अनेक दावे करतात. खरच एलियन्स अस्तित्वात आहेत का? याबाबत संशोधन सुरु आहे. तसेच कोणत्या ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याबाबत देखील संशोधन सुरु आहे.
Man On Other Planets : ब्रम्हांडात अनेक ग्रह आहेत. या ग्रहांवर देखील पृथ्वीसारखी जीवसृष्टी अस्तित्वात आहे. एलियन्सशी संपर्कात आल्याचा दावा अनेक जण करतात. मात्र, एलियन्सबाबत ठोस पुरावे अथवा दावे समोर आलेले नाहीत. यामुळे एलियन्स अस्तित्वात असल्याच्या दावा नेहमीच खोडून काढला जातो. त्यातच आता फक्त पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व असल्याचा दावा करण्यात आला आहे. नासामध्ये वैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या डॉ. अनिता सेनगुप्ता (Former NASA scientist Dr. Anita Sengupta) यांनी केला आहे.
डॉ. अनिता सेनगुप्ता या नासाचे माजी शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता आहेत. पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक टाईम ट्र्रॅव्हलर तसेच संशोधक एलियन्सबाबत अनेक दावे करतात. खरच एलियन्स अस्तित्वात आहेत का? याबाबत संशोधन सुरु आहे. तसेच कोणत्या ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याबाबत देखील संशोधन सुरु आहे.
मंगळ आणि चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न
मंगळ आणि चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. यासाठी नासाने अनेक महत्वपूर्ण मोहिमा नासाने हाती घेतले आहे. यावर अविरत संशोधल सुरु आहे. सूर्यमालेत अनेक ग्रह आहेत. यापैकी पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. मात्र, इतर ग्रहावर देखील जीवसृष्टी अस्तित्वात आहे का किंवा होती का? याबाबत देखील संशोधन सुरु आहे. गुरूच्या चंद्रावर जीवसृष्टी असू शकते. कारण तिथे बर्फाळ समुद्र आहे. येथे कदाचित जीवसृष्टी असू शकते. तसेच शनीच्या चंद्रावरही सेंद्रिय पदार्थ आहे. तिथेही जीवन असू शकते अथवा अमीबासारखे एक पेशी जीव अस्तित्वात असू शकतात असा दावा डॉ. अनिता सेनगुप्ता यांनी केला आहे.