मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक अलिबाबा समूहाचे मालक जॅक मा सध्या कोठे आहे याविषयीचे गूढ आणखीनच वाढत चालले आहे. वृत्तानुसार गेल्या दोन महिन्यांपासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाही. खरं तर, जॅक मा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका मुद्यावर चीनी सरकारवर टीका केली होती. वृत्तानुसार जॅक मा तेव्हापासून सार्वजनिकपणे दिसलेले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द टेलीग्राफच्या माहितीनुसार, जेव्हा ते आपल्या टॅलेंट शोमध्ये दिसले नाही. तेव्हापासून जॅक मा यांच्याबद्दलचे गूढ आणखीनच वाढले. या भागात जॅक मा यांच्या जागी अलिबाबाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. अलिबाबाच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, जॅक मा आपल्या व्यस्त वेळापत्रकांमुळे या भागात भाग घेऊ शकले नाही. प्रोग्रामचा वेबसाइटवरून जॅक मा यांचे फोटो काढल्यानंतर हे रहस्य आणखीनच वाढले.


ऑक्टोबर 2020 मध्ये जॅक मा यांनी चीनच्या आर्थिक नियामक आणि सरकारी बँकांवर टीका केली. शांघाय येथील भाषणात त्यांनी ही टीका केली. जॅक मा यांनी सरकारला व्यवसायात नाविन्यपूर्ण प्रयत्नांना अडथळा आणणार्‍या यंत्रणेत बदल करण्याचे आवाहन केले होते. जॅक मा यांच्या या भाषणानंतर चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष जॅक मा यांच्यावर चिडले. तेव्हापासून जॅक मा यांच्या एंट ग्रुपसह अनेक व्यवसायांवर निर्बंध लादण्यास सुरवात झाली आहे.


एंट ग्रुपचा आयपीओ निलंबित झाल्यापासून माध्यमांमध्ये राहणारे जॅक मा अचानक गायब झाले. २०१६ आणि २०१७ मध्ये चीनच्या कुप्रसिद्ध भ्रष्टाचार विरोधी मोहिमेदरम्यान अनेक अब्जाधीश बेपत्ता झाले होते. यापैकी काही पुन्हा समोर आले. त्यांनी सांगितलं की, ते अधिकाऱ्यांना मदत करत होते. पण काही जण अजूनही परत दिसलेले नाही.