मुंबई : अनेक मूळ भारतीय परदेशातील मोठ्या कंपन्यांचे सीईओ आहेत . ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आपल्या पगारासाठीही यापूर्वी खूप चर्चेत होते. आता आणखी एक मूळ भारतीय व्यक्ती चर्चेत आली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॅटरी बनवणाऱ्या एका स्टार्टअप कंपनीने या व्यक्तीला वार्षिक 17 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. महिन्याला हा पगार जवळ-जवळ १५०० कोटी रुपयांच्या आसपास आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगदीप सिंग असे या मूळ भारतीय व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या सॅलरी पॅकेजमुळे, जगदीप सिंग हे जगभरात चर्चेत आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे पॅकेज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलोन मस्कशी स्पर्धा करण्यासारखंच आहे.


जगदीप सिंग यांना 17 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज


जगदीप सिंगच्या सॅलरी पॅकेजची बातमी आली आणि जगातील आघाडीच्या कंपन्यांचे सीईओंनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. जगदीप सिंग यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले आहे. 


याशिवाय त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीए आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. त्याला QuantumScape Corpने $2.3 अब्ज डॉलरचं पॅकेज दिले आहे.


भारतीय वंशाचे जगदीप सिंग अमेरिकन स्टार्टअप कंपनी QuantumScape Corp चे सीईओ बनले आहेत. कंपनीने त्यांना 17 हजार 500 कोटी रुपयांचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे. ही कंपनी वर्षभरापूर्वीच जगासमोर आली आहे. कंपनीच्या भागधारकांच्या वार्षिक बैठकीत भारतीय वंशाच्या जगदीप सिंग यांना एवढ्या मोठ्या पॅकेजसाठी मंजुरी देण्यात आली आहे.



यापूर्वीही अनेक कंपन्यांचे सीईओ 


ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जगदीप सिंग QuantumScape Corp चे संस्थापक आहेत. त्यांनी यापूर्वी 2001 ते 2009 दरम्यान Infinera चे सीईओ म्हणून काम केले होते. 2001 पूर्वी ते lightera Networks, AirSoft सारख्या कंपन्यांचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी 2010 मध्ये  QuantumScape Corp ची पायाभरणी केली.


कंपनीचे मूल्य $50 अब्ज


फोक्सवॅगन आणि बिल गेट्सच्या व्हेंचर फंडांनीही जगदीप सिंग यांच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. कंपनीचे मूल्य सध्या $50 अब्ज आहे. ही कंपनी पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर भर देत आहे. यासह, इलेक्ट्रिक वाहने जगभरात स्वीकारली जाऊ शकतात. जगदीप सिंग यांची कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मात्यांद्वारे लिथियम-आयन बॅटरीला अधिक सुरक्षित आणि स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे.