Monkey : पिंजऱ्यात एकटीच असलेली माकडीन गरोदर; कुणी केलं हे कृत्य? प्राणी संग्राहलयाच्या कर्मचाऱ्यांना पडला प्रश्न
माकडीन गरोदर राहिल्यानंतर प्राणी संग्राहलयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी हे कृत्य करणाऱ्याचा शोध सुरु केला. अखेरीस दोन वर्षांनतर हे कृत्य करणारा सापडला.
Japan Fujishima Zoo : प्राणी संग्राहलयात अनेक प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवले जाते. बऱ्याचदा अनेक प्राण्यांना एकटे ठेवले जाते. यामुळे या प्राण्यांवर प्राणी संग्राहलयातील कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष असते. मात्र, पिंजऱ्यात एकटीच असलेली माकडीन गरोदर राहिल्याने (monkey become pregnant) खळबळ उडाली आहे. जपानमधील एका मोठ्या प्राणी संग्राहलयात (Japan Fujishima Zoo ) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंजऱ्यात माकडीन एकटीच असताना हे कृत्य केले कुणी असा प्रश्न प्राणी संग्राहलयाच्या कर्मचाऱ्यांना पडला. अखेर दोन वर्षानंतर याचा उलगडा झाला आहे.
जपानच्या नागासाकी येथील कुजुकुशिमा प्राणी संग्रहालय आणि बोटॅनिकल गार्डनमध्ये हा विचित्र प्रकार घडला आहे. मिमो गिब्बन असे गर्भवती राहिलेल्या माकडिनीचे नाव आहे. मिमोला एकटीला स्वतंत्र पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. या माकडीनीचे वय 32 वर्ष आहे.
मिमो गर्भवती राहिल्यानंतर तिने पिलाला जन्म दिला. यानंतर प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी मिमोच्या वडिलांच्या पित्याचा शोध सुरु केला. अखेरीस दोन वर्षानंतर DNA च्या आधारे मिमोला गर्भवती करणाऱ्याचा शोध घेण्यात यश आला आहे.
कुणी केलं मिमोला गर्भवती?
प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांना मिमो पिलांच्या आणि स्वत:चा जवळ येवू देत नव्हती. यामुळे यांच्या विष्ठेच्या माध्यामातून DNA द्वारे मिमोला गर्भवती करणाऱ्याचा शोध घेण्यात आला. प्राणी संग्रहालयातील सर्व प्राण्यांशी मिमो आणि तिच्या पिलांचे DNA मॅच करण्यात आले. अखेरीस प्राणी संग्रहालयातील इटोह नावाच्या माकडाशी यांचे DNA मॅच झाले. यावरुन इटोह यानेच मिमोला गर्भवती केल्याचे उघड झाले.
कसे झाले यांच्यामध्ये संबध
मिमोला एकटीला स्वतंत्र पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. यामुळे तिने कुणीशी आणि कशाप्रकारे लैंगिक संबध प्रस्थापित केले असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. यामुळे प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी मिमोच्या पिंजऱ्याचे बारकाईने निरीक्षण केले. यावेळी पिंजऱ्याजवळ एका ठिकाणी मोठा गॅप होता. या गॅपमधूनच मिमो आणि इटोह यांच्यात संबध निर्माण केले असावेत असा अंदाज प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी वर्तवला आहे. द सनने याबबातचे वृत्त दिले आहे.