नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान शिंजो अबे सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. जपानचे पंतप्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक लाख कोटींच्या महत्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रॉजेक्टची सुरुवात करण्यासाठी अहमदाबादला जावू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही नेते जपान इंडस्ट्रियल पार्क्सच्या लॉन्चिंगमध्ये देखील सहभागी होणार आहे. याशिवाय साबरमती रिवरफ्रंटवर आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्यातही ते सहभागी होणार आहेत.


शिंजो अबे यांच्या भारत दौऱ्यात गुजरात सरकार आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिवलचे यजमान असणार आहेत. याच्या माध्यमातून ते गुजरात, भारत आणि जगातील बुद्धांशी जोडलेला वारसा याचं दर्शन घडवणार आहेत.