Japan Moon Mission : भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 चा विक्रम लँंडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर असून त्यांना पुन्हा Active करण्यासाठी इस्रोच्या टीमकडून अथक प्रयत्न सुरु आहेत. तर, दुसरीकडे चंद्राच्या दिशेने प्रवास करत असलेल्या जपान स्मार्ट लँडर अर्थात मून स्नायपरने पहिला फोटो पाठवला आहे.  पृथ्वीवरील सूर्योदय अंतराळातून कसा दिसतो याचा फोटो जपानच्या मून स्नायपरने टिपला आहे. सूर्योदयाचा हा अतिशय सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 


जपानी स्पेस एजन्सीने शेअर केला पृथ्वीवरील सूर्योदयाचा फोटो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानने स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अर्थात मून स्नायपरने आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर पाठवले आहे.  जपानी स्पेस एजन्सी JAXA ने मून स्नायपरने टिपलेला हा पृथ्वीवरील सूर्योदयाचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.  पृथ्वीपासून 1 लाख किमी अंतरावरून मून स्नायपरने हा फोटो  काढला आहे. मून स्नायपर लँडरचा कॅमेरा अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की तो चंद्रावरील खड्डे ओळखू शकतो. यात नेव्हिगेशन सिस्टीम देखील आहे. जापनच्या या स्लिम मून स्नायपरने 26 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा आपली कक्षा बदलली आहे.


 


चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिगनंतर जपानचे मून स्नायपर अवकाशात झेपावले


23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. यानंतर  07 सप्टेंबर 2023 रोजी जपानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अर्थात मून स्नायपरने आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) लाँच झाले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले. H-IIA रॉकेटद्वारे  या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले.



भारताचे चांद्रयान 3 हे 40 दिवसांत चंद्रावर पोहचले तर जपानचे मून स्नायपर 6 महिन्यांनी पोहचणार


भारताचे चांद्रयान 3 हे 40 दिवसांत चंद्रावर पोहचले. म्हणजेच 14 जुलै रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले आणि 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले.  मात्र, जपानचे मून स्नायपर हे तब्बल 6 महिन्यांनी म्हणेजच फेब्रुवारी 2024 मध्ये चंद्रावर लँडिंग करणार आहे.  जपानचे हे SLIM लँडर वजनाला  खूपच हलके असून हे रोबोटिक लँडर आहे.  ठरलेल्या जागेतच हे लँडर उतरणार आहे.   या यानाची संभाव्य लँडिंग साइट Mare Nectaris अशी आहे.  हे यान जास्तीत जास्त इंधनाची बचत करण्यासाठी गुरुत्वाकर्षण बलाचा अधिक वापर करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. यामुळेच यानाला चंद्रावर पोहचण्यासाठी 6 महिने लागणार आहेत.


जपानचे मून स्नाइपर चंद्रावर काय संशोधन करणार?


जपानचे मून स्नाइपर चंद्रावर वाहणाऱ्या प्लाज्मा लहरींचा अभ्यास करणार आहे. तसेच ब्रम्हांडात ताऱ्यांची निर्मिती कशी झाली. आकाशगंगा यांवर देखील हे यान संशोधन करणार आहे.