टोकियो : सोशल मीडियावर एका आजोबाच्या क्रूरतेचा विकृत कळस दाखवणारे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत दिसणाऱ्या पीडतेनेच हे फोटो सोशल मीडियावर टाकल्याचा दावा करण्यात येत आहे.


कौटुंबिक हिंसाचाराची बळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडितेने केलेला दावा असा की, फोटोत दिसणारी आपली ही आवस्था आपल्या आजोबांमुळे झाली आहे. आजोबांनी केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराची मी बळी ठरली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून पीडितेने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचाच प्रयत्न एक प्रकारे केला आहे. पीडितने असेही म्हटले आहे की, आपल्याला खायला अन्नही दिले जात नसे. जर, आपण चोरून अन्न खाण्याचा प्रयत्न केला तर, आपल्याला मारहाण केली जात असे. डेलीमेल डॉट कॉमने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.


पीडितेने सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो हे सुमारे १० वर्षापूर्वीचे असल्याचे बोलले जात आहे. दहा वर्षापूर्वी जेव्हा तिला रेस्क्यू करण्यात आले तेव्हा तिचे वजन अवघे १६ ते १७ किलो असल्याचे पुढे आले होते. 


पोटातील अन्न बाहेर येईपर्यंत मारहाण


प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यानुसार पीडितेच्या पालन पोषणाची जबाबदारी तिच्या आजोबांवर सोपविण्यात आली होती. मात्र, आजोबा तिला खाण्यासाठी अन्नच देत नसत. पीडितेने अगदीच जर अन्न खाल्ले तर, ते तिच्या पोटावर लाथ मारत असत. तसेच, ती जोपर्यंत उलटी करून अन्न बाहेर काढत नाही, तोपर्यंत तिला मारहाण केली जात असे.