Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन आता यशस्वी टप्प्यात आले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड होणार आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा देखील निश्चित केली आहे.   भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी H-IIA रॉकेटद्वारे जपानच्या या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले. फेब्रुवारी 2024 मध्ये हे यान चंद्रावर लँडिंग करेल असे शक्यता वर्तवण्यात आली होती. या यानाच्या लँडिगसाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, 5 महिन्यातच हे यान चंद्राच्या जवळ पोहचले आहे. जपानच्या यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. या यानाच्या लँंडिंगची तारीख देखील निश्चित झाली आहे.  19 जानेवारी 2024 रोजी जपानचे हे यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. शिओली क्रेटर या जागेवर जपानचे हे यान लँड करणार आहे. रशियाचे LUNA यान चंद्रावर क्रॅश झाले होते. भारताच्या चांद्रयान 3 ने यशस्वी लँडिग करुन मोहिम यशस्वी केली. यामुळे आता जपानच्या मून लँडिगकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 


जपानचे यान चंद्रावर ठरलेल्या ठिकाणीच लँडिंग करणार


23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. यानंतर  07 सप्टेंबर 2023 रोजी जपानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अर्थात मून स्नायपरने आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) लाँच झाले. हे यान अतिशय स्लिम आहे. यामुळे ते निश्चित केलेल्या जागेवर अचूक लँंडिग करेल असा दावा जपानने केला आहे.  अत्यंत अचूकपणे सुनिश्चित ठिकाणी चंद्रावर लँडिंग करण्याची क्षमता जपानला सिद्ध करायची आहे. जपानचे हे SLIM लँडर वजनाला खूपच हलके आहे. हे रोबोटिक लँडर आहे. शिओली क्रेटर या जागेवर जपानचे हे यान लँड करणार आहे. शिओली क्रेटर या जागे जागेला Mare Nectaris असेही म्हणातात. हा प्रदेश चंद्राचा समुद्र म्हणून ओळखला जातो. चंद्रावरील या जागेत खूप गडद अंधार असतो.  स्लिम लँडर प्रगत ऑप्टिकल आणि इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या यानासोबत असलेल्या  एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) पेलोडची निर्मिती जापान, नासा आणि यूरोपियन स्पेस एजन्सी यांनी एकत्रितरित्या केली आहे. या यानाचे वैशिष्ट्य म्हणजे ठरलेल्या जागेतच हे लँडर उतरणार आहे. यात कोणताही बदल होणार नाही. हे यान अचूक आणि सॉफ्ट लँडिंग करणार आहे. XRISM च्या मदतीने चंद्रावर वाहणाऱ्या प्लाज्मा लहरींचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे ब्रम्हांडात ताऱ्यांची निर्मिती कशी झाली. तसेच आकाशगंगा याबाबतची अनेक रहस्य उलगडणार आहेत. या यानाने जास्तीत जास्त इंधनाची बचत करण्यासाठी गुरुत्वाकर्षण बलाचा अधिक वापर करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण केले . यामुळे या यानाला चंद्राच्या कक्षेत पोहचण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागाला आहे.