कोरोना नाही तर `या` कारणामुळे अमेरिकेत पुन्हा लॉकडाऊन
अमेरिकेतील या शहरात कोणत्या कारणामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागला?
वॉशिंग्टन : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जगभरात दहशत परसली आहे. अमेरिकेतील एक शहरात आता लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याचं कारण कोरोना नाही तर आणखीन वेगळं आहे. अमेरिकेतील संसद भवन परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसद भवनावर हिंसक निदर्शनं केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वॉशिंग्टन शहरात आता लॉकडाऊन करण्यात आला आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आली आहे.
या लॉकडाऊन करण्यामागचं कारण कोरोना नाही तर जो बायडन यांचा शपथविधी सोहळा आहे. अमेरिकेच्या संसद भवनावर झालेल्या हिंसक हल्ल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. आज जो बायडन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत.
जो बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. हा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर संसद भवनासह वॉशिंग्टन शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून देखील जो बायडन यांच्यावर हल्ला करण्यात येण्याची शक्यता आहे. अशी संभाव्य शंका सुरक्षा एजन्सीकडून व्यक्त करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी काही दिवसांपूर्वी संसद भवनावर हिंसक निदर्शनं केली होती. त्यानंतर वॉशिंग्टनमध्ये दोन आठवडे लॉकडाऊन करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा वॉशिंग्टनमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये हा त्यामागचा मुख्य हेतू आहे.
25 हजारहून अधिक सुरक्षा रक्षक आणि पोलीस तैनात
शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 25 हजारहून अधिक सैनिक आणि पोलिसांची सुरक्षा आहे. अमेरिकेच्या संसद भवनाला घेराबंदीचं स्वरुप आलं आहे. प्रत्येक मार्गावर, चौकात चेकपोस्ट करण्यात आल्या आहेत.
FBI ने केलेल्या तपासणीनंतर 12 संशयीत सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यापासून जो बायडन यांना धोका असल्याची माहिती FBI ला मिळाली होती. त्यानंतर या 12 सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.