न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पहिल्यांदाच तालिबानच्या परिस्थितीवर भाष्य करताना, तालिबानला स्पष्ट इशारा दिला आहे. अमेरिकेने या इशाऱ्याआधीच अफगाणिस्तानला पुन्हा ६ हजार सैनिक परत पाठवले आहेत. अफगाणिस्तानातून आणखी काही अधिकारी आणि सैनिक अमेरिकेत परतणार आहेत, त्यांच्या आजबाजूची परिस्थिती अपेक्षेपेक्षा जास्त खराब झाल्याने त्यांना सुरक्षित अमेरिकेत परत आणण्यासाठी अमेरिकेने ६ हजार सैनिक पुन्हा परत तर पाठवलेच आहेत, पण त्यासोबत तालिबानला कडक शब्दात इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे, "अमेरिकन अफगाणिस्तानमधून शांततेने निघण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण ते देखील धोक्याशिवाय शक्य होत नाहीय. ते देखील एक आव्हान आहे. जेव्हा आम्ही आमचे लोक अफगाणिस्तानातून हटवत आहोत, तेव्हा तालिबानला स्पष्ट सांगितले आहे की, जर त्यांनी आमच्या सैनिकावर किंवा कोणत्याही अधिकाऱ्यावर हल्ला केला, किंवा या ऑपरेशनमध्ये बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर याचा परिणाम चांगला होणार नाही."


जो बायडन आणखी पुढे बोलताना म्हणाले, "आम्ही अफगाणिस्तानच्या लोकांचं समर्थन करत राहू, आम्हीय क्षेत्रीय कुटनीतीने अफगाणिस्तानमध्ये शांती बनवण्याचा प्रयत्न करु. आम्ही अफगाणिस्तानच्या लोकांसाठी खास करुन अफगाण महिलांच्या हक्कासाठी नेहमीच लढत राहू.नागरिकांचे हक्क आणि सुरक्षा हा आमचा परेदशी नीतीचा मुख्य मुद्दा आहे."