वॉशिंग्टन : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. शिवाय कोरोना या धोकादायक विषाणूमुळे सर्वच देशांची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. याच दरम्यान अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील नवनिर्वाचीत खासदाराला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ल्यूक जोशुआ लेटलो असं त्यांचं नाव होतं. रविवारी ते खासदार पदाची शपथ घेणार होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18 डिसेंबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं हो्तं. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ल्यूक जोशुआ लेटलो यांना कोरोनाची लागण झल्याचं कळताचं राहत्या घरी आयसोलेट करण्यात आलं. मात्र १९ डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी जुलिया बरनहिल लेटलो आणि दोन मुलं आहेत. लेटलो अमेरिकेतील राजकारणातले उच्च नेते होते.