जॉनसनच्या पावडरमुळे कॅन्सर, २७ अरबचा दंड
जगभरात तान्हा बाळाला पावडर, तेल, शॅम्पू सारखी उत्पादन देणारी कंपनी जॉनसन अॅण्ड जॉनसन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या जॉनसनच्या पावडरमुळे बाळांना कॅन्सर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणि....
मुंबई : जगभरात तान्हा बाळाला पावडर, तेल, शॅम्पू सारखी उत्पादन देणारी कंपनी जॉनसन अॅण्ड जॉनसन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या जॉनसनच्या पावडरमुळे बाळांना कॅन्सर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणि....
यामुळे आता कंपनीवर ४१७ मिलियन डॉलर म्हणजे २६७२ कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. बीबीसीच्या माहितीनुसार अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या कोर्टाने जॉनसन अॅण्ड जॉनसनला आदेश दिला आहे की, पीडित महिलेला याची भरपाई द्यावी. महिलेने आरोप केला होता की, कंपनीच्या टॅल्कम पावडरमुळे तिला गर्भाशयाचा कन्सर झाला. आणि ही महिला कोर्टात ही केस जिंकली. मात्र कंपनीने या विरोधात वरच्या कोर्टात देखील धाव घेतली. मात्र या अगोदर कंपनीवर असे ४ ते ५ केस सुरू होते. आणि कंपनी त्या केस हरलेली आहे.
त्या महिलेच्या वकिलांनी सांगितलं की, ६३ वर्षाची महिला ११ वर्षाची असताना ती जॉनसन अॅण्ड जॉनसनच्या बेबी पावडरचा वापर करत असे. मात्र १० वर्षापूर्वी तिला कॅन्सर हा रोग झाला. यापूर्वीही जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला तब्बल ७२ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ४९४ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील सेंट लुईस सर्किट कोर्टाने कंपनीवर ही दंडात्मक कारवाई केली आहे.