`ही` महिला तिस-यांदा मृत्यूच्या दारातून परतली
स्पेनच्या बार्सिलोना येथे गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला आणि एकच खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सहा नागरिकांना मृत्यू झाला मात्र, एक महिला सुदैवाने बचावली आणि त्यानंतर ती चर्चेचा विषय ठरली आहे.
बार्सिलोना : स्पेनच्या बार्सिलोना येथे गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला आणि एकच खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सहा नागरिकांना मृत्यू झाला मात्र, एक महिला सुदैवाने बचावली आणि त्यानंतर ती चर्चेचा विषय ठरली आहे.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात राहणारी ज्यूलिया मोनॅको ही गुरुवारी बार्सिलोना येथे आपल्या मैत्रिणीसोबत शॉपिंग करत होती. त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी हल्ला केला.
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला तर अनेक नागरिक जखमी झाले. या हल्ल्यातून ज्यूलिया सुखरूप बचावली. या घटनेनंतर ज्यूलियाने ट्विट केलं आहे.
ज्यूलिया या हल्ल्याची साक्षीदार असून ट्विटरवर तीने म्हटले आहे की, हा तिसरा दहशतवादी हल्ला माझ्या समोर झाला आहे. मी या हल्ल्यांना घाबरणार नाही.
लंडन, पॅरिस आणि बार्सिलोना अशा तीन दहशतवाद्यांमधून ज्यूलिया बचावली आहे. ३ जून रोजी लंडनमध्ये दहशतवाद्यांच्या चाकू हल्ल्यातून ज्यूलिया बचावली होती.
तर काही दिवसांपूर्वी पॅरिसमधील नोथ्रे डेम कॅथेड्रल दहशतवाद्याने पोलिसांवर हातोड्याने हल्ला केला त्यावेळी ज्यूलिया त्याच परिसरात होती.