Kabul Blast: 2 आत्मघातकी हल्ल्याने काबूल हादरलं, 13 जणांचा मृत्यू...आकडा वाढण्याची भीती
तालिबानच्या कब्जानंतर काबुल विमानतळाच्या गेटवर मोठा बॉम्बस्फोट
काबुल: तालिबानच्या कब्जानंतर आता काबुल विमातळावर दोन मोठे स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. आणखी स्फोट होण्याची भीती फ्रान्स आणि अमेरिकेनं व्यक्त केली आहे. तर या स्फोटात अमेरिकेचे 3 सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटोत 60 लोक जखमी झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. काबुल विमानतळावरील एन्ट्री गेटजवळ हा भीषण स्फोट झाला आहे.
काबूल विमानतळावर भीषण स्फोटानंतर नागरिकांची धावपळ चालू झाली. हा आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा हल्ला नेमका कोणी घडवून आणला याची माहिती अद्याप समोर आली नाही. हल्ल्याची माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार काबुल विमानतळावर 2 स्फोटांचे आवाज आले असून 60 लोक जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
काबुलनंतर आणखी एका ठिकाणी आत्मघातकी हल्ला झाला आहे. काबुलमध्ये दोन आत्मघातकी स्फोट झाल्याने हादरलं आहे. तर एक रिपोर्टनुसार या हल्ल्याची जबाबदारी ISISने घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे तालिबान विरुद्ध ISIS असा संघर्ष सुरू होणार का? हा प्रश्न आहे.