ISIS विरोधात आरपारची लढाई? काबूल हल्लेखोरांवर कारवाईच्या तयारीत अमेरिका
Kabul Blast : काबूल विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी इस्लामिक स्टेटला (ISIS) कडक इशारा दिला आहे.
काबूल / वॉशिंग्टन : Kabul Blast : काबूल विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी इस्लामिक स्टेटला (ISIS) कडक इशारा दिला आहे. आत्मघातकी हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट (Kabul Airport Blast)घडवला. या हल्ल्यानंतर अमेरिकेत संतप्त झाली आहे. हल्लेखोर जिवंत राहणार नाहीत, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, अमेरिका ISISच्या गुन्हेगारांना शोधून त्यांना शिक्षा करेल. दोषींचा तातडीने शोध घेऊन बदला घेऊ, असे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.
बायडेन यांचा ISISला इशारा दिला
आपले सैनिक आणि सामान्य अफगाणांच्या मृत्यूनंतर, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन पत्रकार परिषदेदरम्यान भावनिक झाले आणि म्हणाले की, ISIS ला त्याची किंमत मोजावी लागेल. ही जखम आम्ही विसरणार नाही. आम्ही प्रत्येक दहशतवादी शोधून त्यांना ठार मारू.
ISIS विरोधात ऐलान-ए-जंग?
ज्यो बायडेन म्हणाले, 'ज्यांनी हा हल्ला केला आहे किंवा ज्यांना अमेरिकेचे नुकसान करायचे आहे. त्यांना ही गोष्ट नीट कळू द्या की आम्ही ना माफ करणार नाही ना विसरणार. आम्ही शत्रूंचा शोध घेऊ आणि त्यांना त्यांच्या कृत्याची निश्चितच शिक्षा होईल. दहशतवादी हल्ल्यानंतर ज्यो बायडेन यांच्या वक्तव्याकडे इस्लामिक स्टेटविरुद्ध (ISIS) युद्धाची घोषणा म्हणून पाहिले जात आहे.
'अमेरिका आपले मिशन पूर्ण करेल'
ज्यो बायडेन म्हणाले, 'आमची बुद्धिमत्ता अशी होती की इसिसचे (ISIS) दहशतवादी अमेरिकन नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या कमांडोनी स्पष्ट केले होते की, आम्ही आमचे ध्येय पूर्ण करायला हवे आणि आम्ही ते पूर्ण करत राहू. ISISचे दहशतवादी जिंकणार नाहीत. आम्ही अमेरिकन लोकांना बाहेर काढू.
दहशतवादी हल्ल्यानंतर कोण काय म्हणाले?
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) म्हणाले, 'काबूलमधील परिस्थिती बिकट झाली आहे आणि आम्ही फ्रेंच राजदूत परत बोलवू.' त्याचवेळी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) म्हणाले, 'तालिबानला मान्यता देण्याबाबत आम्ही अद्याप निर्णय घेणार नाही.
13 अमेरिकन सैनिकांसह 90 ठार
गुरुवारी अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळाजवळ एका जमावावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात आणि बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 90 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यात 13 अमेरिकन कमांडो ठार झाले आहेत, तर 18 जखमी झाले आहेत. एका अफगाण अधिकाऱ्याने दावा केला आहे की, विमानतळावरील हल्ल्यात किमान 60 अफगाणी ठार झाले आहेत आणि सुमारे 143 इतर जखमी झाले आहेत.
तालिबान आणि हक्कानीमध्ये इसिसची लिंक : सालेह
अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी एका ट्विटमध्ये तालिबानचे इसिसशी (ISIS) संबंध असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, "आमच्याकडे असलेले प्रत्येक पुरावे दर्शवतात की IS-K ची मुळे तालिब आणि हक्कानी नेटवर्कमध्ये आहेत, जे विशेषतः काबूलमध्ये सक्रिय आहेत." तालिबानने आयएसआयएसशी असलेला संबंध नाकारला आहे.
आत्मघातकी हल्लेखोराचा फोटो जारी
दरम्यान, आत्मघातकी हल्लेखोराचा फोटो जारी करण्यात आहे. काबूल विमानतळावर झालेल्या भीषण हल्ल्यात 72 जण ठार झालेत. दोन सुसाईड बॉम्बर्सनी विमानतळाबाहेर स्फोट घडवला. त्यात 72 जणांचा मृत्यू झालाय. त्यात अमेरिकन नौदलाचे 11 कमांडो आणि नौदलाचा 1 डॉक्टर यांचा मृत्यू झाला. तर 12 सैनिक गंभीर जखमी झालेत. अमेरिकन सैनिकांच्या मृतांचा आकडा वाढू शकतो. विमानतळावर जाण्यासाठी गर्दी झाली होती. तिथे आयसीसच्या दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट घडवला.