इस्लामाबाद : काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरापती सुरू केल्यात. पाकिस्तानकडून आता स्पेशल सर्व्हिस ग्रुप अर्थात एसएसजीच्या शंभर कमांडोंना एलओसीजवळ पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तान भारताविरोधी कारवाई करण्याच्या हालचाली करत असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानच्या या हालचालीवर भारतीय लष्कराची बारीक नजर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला जशास तसं चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहेत. पाकिस्तानी तैनात केलेले हे कमांडो जैश -ए- मोहम्मद व अन्य दहशतवादी संघटनेशी निगडीत असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय. पाकिस्तानकडून गुजरातच्या सीमेलगत असलेल्या इक्बाल-बाजवा या पोस्टवर एसएसजी कमांडो तैनात करण्यात आलेत. 


पाकिस्तान या कमांडोंचा वापर या ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय जवानांवर हल्ला करण्यासाठी करण्याची शक्यता आहे. तसेच, हे एसएसजी कमांडो भारतीय जवानांविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानच्या ‘बॉर्डर अॅक्शन टीम’ ला देखील मदत करणार असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे.