समलिंगी व्यक्तिसारखे आयुष्य जगणार तो
त्याच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर तो भलताच बदलला. अचानक झालेल्या आरोपाने तो भलताच गर्भगळीत झाला. तितकाच अंतर्मुखही. त्याने आता निर्णयच घेतलाय या पुढे आपलं आयुष्यच वेगळ्या मार्गाने जगायचं. तो म्हणतोय आता आता सगळं आयुष्यंच समलिंगी व्यक्तीसारखं जगायचं ठरवले आहे.
वॉशिंग्टन : त्याच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर तो भलताच बदलला. अचानक झालेल्या आरोपाने तो भलताच गर्भगळीत झाला. तितकाच अंतर्मुखही. त्याने आता निर्णयच घेतलाय या पुढे आपलं आयुष्यच वेगळ्या मार्गाने जगायचं. तो म्हणतोय आता आता सगळं आयुष्यंच समलिंगी व्यक्तीसारखं जगायचं ठरवले आहे.
हा निर्णय आहे अमेरिकेतील सुप्रसिद्ध केविन स्पेसी याचा. त्याच्यावर अॅक्टर एंथोनी रॅपने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. रॅपने स्पेस्पीवर आरोप केला होता की, तो (रॅप) जेव्हा १४ वर्षांचा होता तेव्हा स्पेस्पीने त्याचे लैंगिक शोषण केले होते. रविवारी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, रॅपने म्हटले आहे की, ३१ वर्षांपूर्वी स्पेस्पीने मॅनहटन येथील एका फ्लॅटमध्ये त्याचे लैंगिक शोषण केले होते.
'द गार्डियन डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, आपले लैंगिक आणि खासगी जीवन याबाबत नेहमीच खासगीपन बाळगणाऱ्या स्पेस्पीने ट्विटरच्या मध्यमातून रॅपची जाहीर माफी मागितली आहे. त्याने केवळ माफीच मागितली नाही तर, यापुढचे संपूर्ण आयुष्य एखाद्या समलींगी व्यक्तीप्रमाणे जगू इच्छित असल्याचे जाहीर केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये स्पेस्पीने म्हटले आहे की, 'मी अगदी प्रामाणीकपणे सांगतो की, ही साधारण ३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता फारसे आठवत नाही. मात्र, माझ्यावर आरोप झाला तसे खरोखरच मी वागलो असेन तर, ते दारूच्या नसेत मी तसे वागलो असेन. माझ्या या वर्तनामुळे झालेल्या त्रासाबद्धल मी जाहीर माफी मागतो. रॅपला झालेल्या त्रासाबद्दल मला दुख: वाटते.'
स्पेस्पी इतक्यावरच थांबत नाही. तर, त्याने मी स्त्री आणि पुरूष असे दोघांषीही संबंध ठेवले आहेत. मी माझ्या आयुष्यात पुरूषांसोबत रोमॅंटीक संबंध ठेवले आहेत. आणि आता मी माझे संपूर्ण आयुष्य समलिंगी व्यक्तीसारखे व्यतीत करण्याचे ठरवले आहे.