Mystery Women with kim Jong Un: उत्तर कोरीयाचा नेता किम जोंग उन (Kim Jong-un) हा काही न काही कारणांवरुन नेहमीच चर्चेचा विषय असतो. देशात कोरोना महामारीत आजारी असणे किंवा उत्तर कोरीयाची कोरोना या जागतिक महामारीतून सुटका झाली आहे असं जगाला सांगणे असो किंवा उत्तर कोरीया हा देश परमाणु संपन्न झालाय हे घोषित करणे असो या सर्वच घटनांवरुन किम जोंग उन (Kim Jong-un) कायम चर्चेत असतो. या सगळ्यांमध्ये किम जोंग उन (Kim Jong-un) सोबत कायम एक महिला सावलीसारखी त्यांच्यासोबत असते आणि त्यामुळे देखील किम जोंग उन (Kim Jong-un) पुन्हा चर्चेचा विषय झालाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी प्योंगयांग या 74व्या राष्ट्रीय दिवस कार्यक्रमादरम्यान ती महिला किम जोंग उन (Kim Jong-un) सोबत पुन्हा दिसली. त्या दिवशी तिच्या हातात एक हैंडबैग होती असे सांगितले जातंय की त्या बॅगेत उत्तर कोरियाच्या न्यूक्लियर डॉक्ट्रिन संदर्भातील किम जोंग उन (Kim Jong-un) चे भाषण त्यात होते. असे पण सांगितले जातंय की ही महिला किम जोंग उनच्या (Kim Jong-un) बहिनीची जागा घेणार आहे. 


रिपोर्टच्या अनुसार, या रहस्यमयी महिलेला किम जोंग उन (Kim Jong-un) सोबत  लोक वर्षाच्या सुरुवातीपासूनच ट्रॅक करत आहेत. काही लोक ती महिला किम जोंग उन ची(Kim Jong-un) नातेवाईक असल्याचा दावा करत आहेत पण अद्याप ती महिला कोण आहे याचा अजूनही शोध लागलेला नाही. या महिलेला 74व्या राष्ट्रीय दिवसच्या सेलिब्रेशन दरम्यान, बऱ्याच कोरियाई इवेंटमध्ये आणि कोरियाई सेंट्रल टेलीविजन (केसीटीवी) च्या व्हिडियो फुटेज मध्ये तिला पाहण्यात आले आहे. ती नेहमीच किम जोंग उन (Kim Jong-un) च्या टेबलाजवळ दिसते. 


या महिलेला पहिल्यादां फेब्रुवारी मध्ये पाहिलं
या महिलेला उत्तर कोरियाच्या सुप्रीम पीपुल्स असेंबली (एसपीए) एका सेशन मध्ये किम जोंग उन सोबत पाहिले होते. तिच्यासोबत किम जोंग उनच्या (Kim Jong-un) भाषणाची फाईल देखील होती. दोन महिन्याआधी 27 जूलैला या महिलेला किम जोंग उन (Kim Jong-un) सोबत प्रमुख आउटडोर म्यूजिक इवेंट पाहिलं होतं. तेव्हा देखील ही महिला हँडबॅग सोबत नजरेत आली त्या बॅगेत किम जोंग उनचे (Kim Jong-un) सिगारेट, फोन किंवा औषध असते तीच बॅग तिच्याजवळ होती. 


लोक सांगतात ती आहे सावत्र बहिण
उत्तर कोरियाच्या सरकारी मीडिया ने ही महिला कोण आहे अजूनही याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. या महिलेची ओळख अजूनही समोर आलेली नाही. काहीजण त्या महिलेला किम जोंग उनची (Kim Jong-un) सावत्र बहीण सांगतात तर काहीजण तिला त्याची मैत्रिण म्हणून सांगतात. पण अद्याप हे गुपित आहे. किम जोंग उनला (Kim Jong-un) कमीत कमी दोन सावत्र बहिनी आहेत ज्यांची नावे किम सोल सॉन्ग आणि किम चुन सॉन्ग. दोघींचा जन्म 1970च्या दशकातला. पण ही महिला त्या दोघींच्या तुलनेत लहान दिसत आहे अशामध्ये ती महिला किम जोंग उनची (Kim Jong-un) बहिण असण्याची शक्यता खुप कमी वर्तवली जात आहे.