King Charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील त्या गूढ सावलीचं रहस्य उलगडलं! पाहा कोण होती ती व्यक्ती
King Charles III Coronation : असं म्हणतात की ब्रिटनच्या राजघराण्याची अनेक गुपितं आजही जगासमोर आलेली नाहीत. त्यातच आणखी एका गूढ रहस्याची भर पडली होती. पण, चर्चांना आणखी वाव मिळण्याआधीच नेमकं सत्यही उघड झालं.
King Charles III Coronation : ब्रिटनला तब्बल सात दशकांनंतर नवा राजा मिळाला. सर्वाधिक काळासाठी राणीपदावर राहिलेल्या Queen Elizabeth II यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आणि तत्काली प्रिन्स ऑफ वेल्स प्रिन्स चार्ल्स यांना राजेपदासाठी नियुक्त करण्यात आलं. सप्टेंबर 2022 मध्येच तशी अधिकृत घोषणाही झाली. जेव्हापासून ते किंग चार्ल्स III म्हणून संबोधले जाऊ लागले. असं असलं तरीही त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मे महिन्यापर्यंतची प्रतीक्षा साऱ्या जगानं केली.
नुकतंच वेस्टमिंस्टर अॅबी येथे अतिशय दिमाखदार आणि अद्वितीय अशा सोहळ्यात ख्रिस्त धर्मगुरुंच्या आणि देशातील नागरिकांसह मान्यवरांच्या उपस्थितीत किंग चार्ल्स III यांना राजे एडवर्ड यांच्या सिंहासनावर बसून त्यांना अतिशय मानाचा असा मुकूट प्रदान करण्यात आला. मनाचा ठाव घेणारं संगीत, वयाच्या 74 व्या वर्षी राजेपदावर आलेले किंग चार्ल्स ही सारी दृश्य संपूर्ण जगानं पाहिली. सोशल मीडियावर या क्षणाचे अनेक व्हिडीओसुद्घा व्हायरल झाले.
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी ते निरखून पाहिले आणि एक विचित्र बाब काहींच्या निदर्शनास आली. सैनिकांचा ताफा वेस्टमिंस्टरमध्ये आल्यानंतर दारातून एक पूर्ण काळ्या रंगाची आकृती दुसऱ्या दिशेला जाताना नेटकऱ्यांनी पाहिलं आणि ही काही सेकंदांची क्लिपही शेअर केली. काहींनी तर, हा 'ग्रिम रीपर' (Grim Reaper) अर्थात साक्षात काळ आल्याचं म्हटलं. ही आकृती पाहून अनेकांनाच धडकीही भरली. पण, अखेर यावरून पडदा उचलला गेला.
राज्याभिषेक व्यवस्थित पाहताना ते दिसले आणि दूर झाली भीती...
ब्रिटनच्या राजघराण्यासाठी अत्यंत महत्वाच्या अशा राज्याभिषेकाच्या क्षणी तिथं मृत्यूचं प्रतीक दिसणं अतिशय नकारात्मक असल्याच्या चर्चा होत असतानाच त्यांना शहसुद्धा मिळाला. ती रहस्यमयी व्यक्ती काळ नसून, इंग्लंडच्या धर्मपीठाची अधिकारी आणि ख्रिस्त धर्म अभ्यासक असल्याची माहिती वेस्टमिंस्टर अॅबीच्या अधिकाऱ्यांनी Newsweek ला दिली. त्यांना असं संबोधलं जातं.
हेसुद्धा वाचा : आता खैर नाही... बिल्डर्सच्या दादागिरीला 'महारेरा'चा चाप; नवं घर घेणाऱ्यांसाठी नो टेन्शन!
राजे चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा व्यवस्थित पाहताना त्यांना मुकूट घातल्यानंतरच्या क्षणालाच एक संपूर्ण काळ्या कपड्यातील मध्यमवयीन व्यक्ती समोर येते. हीच व्यक्ती वेस्टमिंस्टरच्या दारावरून गेल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं तिथं काळ होता का? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तो आता विसरून जा. कारण तशी कोणतीही घटना तिथं घडलेलीच नाही.