अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचा पगार माहीत आहे का?
अमेरिकेत ( America) सत्ता पालट झाल्यानंतर नवे अध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden) यांनी शपथ घेतली. ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष (President of America) झाले आहे. त्यामुळे आजपासून अमेरिकेत बायडेन पर्वाला सुरुवात झाली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत ( America) सत्ता पालट झाल्यानंतर नवे अध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden) यांनी शपथ घेतली. ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष (President of America) झाले आहे. त्यामुळे आजपासून अमेरिकेत बायडेन पर्वाला सुरुवात झाली आहे. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांनीसुद्धा जो बायडन यांच्यासह उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. बायडेन हे सर्वाधिक शक्तिशाली देशाचे अध्यक्ष झाल्याने त्यांना किती पगार मिळणार याची उत्सुकता आहे. (Know about salary of Joe Biden 46th President of America)
पगाराचा आकडा धक्क करणारा
जो बायडेन यांच्या अध्यक्ष पदाच्या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा उपस्थित होते. बायडेन हे आता श्रीमंत राष्ट्राचे प्रमुख आहेत. त्याचा पगार किती असेल, याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांच्या पगाराचा आकडा पाहून अनेकांना धक्का बसू शकतो. कारण बायडेन यांना दरवर्षी तब्बल 400000 डॉलर्स (2 कोटी 94 लाख 19 हजार रुपये) वेतन म्हणून मिळणार आहेत. हे वेतन भारताच्या राष्ट्रपतींपेक्षा 5 पटीने जास्त आहे.
पगाराशिवाय आणखी काही बरंच
तसेच या वेतनाशिवाय अमेरीकन राष्ट्राध्यांना वेगवेगळे 17 भत्तेदेखील दिले जातात. त्यांना खर्चासाठी (Expenses) 50000 डॉलर (36 लाख 77 हजार रुपये), प्रवास खर्च म्हणून 100000 डॉलर (73 लाख 54 हजार रुपये) आणि मनोरंजन भत्ता म्हणून 19000 डॉलर (13 लाख 97 हजार रुपये) दिले जातात. यासोबत आणखी 14 भत्ते दिले जातात. यासोबतच विद्यमान आणि माजी राष्ट्राध्यक्षांना सुरक्षा आणि आरोग्य विमा, वॉर्डरोब बजेटही दिले जाते.
आता डोनाल्ड ट्रम्प आलिशान वास्तूत
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता व्हाईट हाऊस सोडावे लागले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आता नेमके कुठे राहायला जाणार, याचीही चर्चा सुरु झाली आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे आलिशान वास्तूत राहायला जाणार आहेत.
डोनाल्ड हे फ्लोरिडा येथील वास्तूत राहायला जाणार आहेत. फ्लोरिडाच्या पाम बीचच्या तटावर मार-ए-लागो इस्टेट नावाची एक मोठी वास्तू आहे. या ठिकाणी ते राहणार असल्याची माहिती आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात मार-ए-लागो येथे बराच वेळ व्यथित केला आहे. त्यामुळे त्यांच्या या घराला ‘व्हिंटर व्हाईट हाऊस’ही म्हटले जाते. त्यांच्या या वास्तूचे नाव आधी ट्रम्प टॉवर असे होते. मात्र, 2019 मध्ये त्यांनी आपल्या घराचे नाव बदलले आणि मार-ए-लागो असे ठेवले.