विश्वाचे रहस्य सांगणाऱ्या स्टीफन हॉकिंग यांच्याबाबत `टॉप १०` गोष्टी
मानवी मेंदू हा संगणकासारखा असून, त्याचा वापर केला नाही तर, तो खराब होतो असे सांगणाऱ्या स्टिफन हॉकिंग यांच्याबद्धल टॉप १० गोष्टी.
मुंबई : विश्वाचे रहस्य सांगणाऱ्या स्टीफन हॉकिंग यांचे आज (१४ मार्च २०१७) आज निधन झाले. त्यांनी स्वर्गाच्या परिकल्पनेला धक्का देत ही केवळ आंधाराला घबरवणारी कहाणी असल्याचे म्हटले. मानवी मेंदू हा संगणकासारखा असून, त्याचा वापर केला नाही तर, तो खराब होतो असे सांगणाऱ्या स्टिफन हॉकिंग यांच्याबद्धल टॉप १० गोष्टी.
- १९७४ मध्ये स्टीफन यांनी जगातील सर्वात मोठा शोध लावला. जगाला ब्लॅक होल थिअरी समजून सांगितली.
- केब्रिज विद्यापीठात अलबर्ट आईन्स्टाईन यांच्या पदावर गणिताचे प्राध्यापक म्हणून नियूक्ती.
- हॉकींग यांना २१व्या वर्षी amyotrophic lateral sclerosis (ALS) नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले.
- २१व्या वर्षानंत हॉकिंग कधीच चालले आणि बोलले नाहीत. त्यांनी आयुष्यभर व्हिल चेअरचा वापर केला. आणि बोलण्यासाठी संगणक आणि तशाच पद्धतीची उपकरणे वापरली.
- १९९८मध्ये प्रकाशित झालेल्या 'ए ब्रीफ ऑफ हिस्ट्री टाईम' पुस्तकाने जगभरात खळबळ. 'बिग बॅंग थेअरी' आणि 'ब्लॅक होल' प्रणालीची सोप्या भाषेत पुस्तकात माडणी.
- गेल्याच वर्षी स्टीफन यांनी इशारा दिला. पृथ्वीवर लोकसंख्या आणि तापमान वाढते आहे. त्यामुळे लवकरच पृथ्वी हा आगीचा गोळा बनेल.
-पीएचडीचा प्रबंध सार्वजनीक करताच प्रचंड लोकप्रिय. १९६६ मध्ये केलेले संशोधन पाहण्यासाठी जगभरातून मागणी. केब्रिज विद्यापीठाची वेबसाईट ठप्प.
- टाईम मशिन बनविण्याचे होते स्वप्न. एकदा स्टीफन म्हणाले होते, माझ्याकडे टाईम मशीन असती तर, हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मनरोलाही मी भेटलो असतो.
- १९७४ मध्ये स्टीफन यांनी भाषा अभ्यासक जेन विल्डेसोबत लग्न केले. दोन मुलांना जन्म दिल्यावर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर हॉकिंग यांनी दुसरे लग्न केले.