कोरोनाबाबत आणखी एका गोष्टीचा खुलासा, पुरुषांनो सावधान !
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोज वाढतो आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोज वाढतो आहे. रोज नवीन माहिती जगभरातून पुढे येत आहे. यात आता आणखी एक धक्कादायक संशोधन समोर आले आहे. नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू पावणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत जगभरातून जमा करण्यात आलेल्या माहितीत ही गोष्ट समोर आली आहे.
आंतरराष्ट्रीय संस्था नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटने आपल्या संशोधनात हा खुलासा केला आहे की, जगात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची पुरुषांची संख्या जास्त आहे. इटलीमधील कोरोना विषाणूच्या संकटावर आधारित या संस्थेने असे म्हटले आहे की, एकूण संक्रमित लोकांपैकी 60 टक्के पुरुष आहेत. विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांपैकी केवळ 30 टक्के महिला तर 70 टक्के पुरुष आहेत.
डॉक्टर डेबोरा ब्रिक्स म्हणतात की, पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त मादक असतात. उदाहरणार्थ, पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक धूम्रपान आणि मद्यपान करतात. याशिवाय, निरोगी राहण्याच्या बाबतीतही पुरुष खूपच कंटाळवाणा दृष्टीकोन ठेवतात. हेच कारण आहे की रोग टाळण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये खूपच कमी असते.
कोरोना विषाणूमुळे मृत्यू
इटलीमध्ये मृत्यू झालेल्या प्रत्येक दहा महिलांमागे पुरुषांची संख्या 24 आहे.
चीनमध्ये मरण पावलेल्या दर दहा महिलांमागे पुरुषांची संख्या 18 आहे.
जर्मनीत मृत्यू झालेल्या प्रत्येक दहा महिलांमागे पुरुषांची संख्या 16 आहे.
कोरोना पॉझिटिव्ह केस
इटलीमध्ये संक्रमित दर दहा महिलांमागे पुरुषांची संख्या 14 आहे.
इराणमध्ये संक्रमित दर दहा महिलांमागे पुरुषांची संख्या 13 आहे.
जर्मनीमध्ये, संक्रमित दर 10 महिलांमागे पुरुषांची संख्या 10 आहे.
भारतामध्ये अद्याप कोरोना विषाणूची लागण झालेल्या महिला आणि पुरुषांची संख्या सामायिक केलेली नाही. यामुळे या क्षणी या संशोधनात देशाचा समावेश झालेला नाही. परंतु संशोधकांना आशा आहे की एकदा सर्व देशांकडून माहिती मिळाल्यानंतर अधिक अचूक माहिती उपलब्ध होईल.
भारतासह जगभरात कोरोना पाय पसरवत चालला आहे. आतापर्यंत जगभरात 34 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 7 लाखाहून अधिक संसर्गित आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 106 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, देशात करोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 1071 झाली आहे. कोरोनाने देशात 29 जणांचा बळी घेतला आहे. तर 99 लोक बरे झाले आहेत आणि घरी गेले आहेत.