मॉस्को : सीरियातील आपल्या आठ ठिकाणांवर होणारा संभाव्य हल्ला विचारात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी पुरेसे सैन्यबळ उपलब्ध असल्याचे रशियाने म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रेमिलीनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोवने एका परिषदेत सहभाग घेताना हे वक्तव्य केले. पेस्कोव म्हणाले, हिकइमिम आणि टारटस सैन्याची रचना ही पूर्णपणे अद्ययावत असून, सर्व प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांना जोड देण्यास सक्षम आहे.


रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही याला पुष्टी देत म्हटले आहे की, ६ जानेवारीला दहशतवाद्यांनी आपल्या शस्त्रांवर १३ सशस्त्र ड्रोनचा वापर करत रात्रभर हल्ला केला. मात्र, हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयार होतो. आम्ही तो हल्ला परतवून लावला. या हल्ल्यावेळी रशियाच्या सैन्याने लष्करी ठिकाणांपासून ड्रोनच्या माध्यमातून ५० किलोमिटर अंतरापर्यंत उड्डान केले होते.


दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, सीरियाच्या पश्चिमेत्तर इदलिब प्रांतात बंडखोरांची ठिकाणांवर सरकारी आणि रशियन विमानांद्वारे केल्या गेलेल्या हल्ल्यात आठ मुलांसह सुमारे २१ नागरिक मारले गेले होते. इदलिब सीरियाचा शेवटच्या प्रांत आहे. जो सरकारी नियंत्रणाबाहेर आहे.