इस्लामाबाद : पाकिस्तानने रिविवारी म्हटले की, कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईने केलेला व्हिसा अर्ज मिळाला असून, त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पाकिस्तानचे  परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाधव यांच्या कुटुंबियांकडून पाठवलेल्या व्हिसा अर्ज भेटल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली.


कायदेशीर प्रक्रिया सुरू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फैजल यांनी ट्विट केली आहे की, कमांडर जाधव यांच्या पत्नी आणि आई यांचा व्हिसा अर्ज मिळाला आहे. तसेच, त्यावर कायदेशीर विचार सुरू आहे. दरम्यान, त्यांनी व्हिसा अर्जाला मान्यता देण्याबाबत किती कालावधी लागेल याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.


पत्नीसोबत आईलाही भेटण्याची मागणी


दरम्यान, पाकिस्तानने 10 नोव्हेंबरला मानवतेच्या आधारावर जाधव यांच्या पत्नी आणि आईला जाधव यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. भारताने पाकिस्तानकडे जाधव यांना पत्नीसोबत आईलाही भेटू द्यावे अशी मागणी केली होती.



हेरगिरीच्या आरोपाखाली केली होती अटक


हेरगिरी केल्याच्या कथीत आरोपाखाली पाकिस्तानने कुलभूषण यादव यांना अटक केली. तेव्हापासून ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. दरम्यान, येत्या 25 डिसेंबरला कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांची भेट होण्याची शक्यता आहे.