नवी दिल्ली : पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हीसा देण्यासंदर्भात पाकिस्तान विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलभूषण यांच्या आई अवंतिका जाधव या कुलभूषण यांची भेट घेऊ शकतील म्हणून त्यांना व्हिजा देण्यात यावा, अशी मागणी भारताने याआधीच केली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दोन दिवसांपूर्वी सरताझ अझीझ यांना पत्र लिहून अवंतिका यांच्या व्हिजाची आठवण करून दिली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीस झकिरीया यांनी हे स्पष्ट केलं. 


मात्र, जाधव यांना कायदेशीर मदत देण्यासंदर्भात अजून पाकिस्तानने कोणतीही हालचाल केली नसल्याचं भारताने म्हटलंय. तसंच अवंतिका जाधव यांना व्हिजा देण्यासंदर्भातही पाकिस्तानने अजून कोणतीही पावलं उचललं नसल्याचंही भारताने स्पष्ट केलंय.  


कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयानं कथित रुपात गुप्तहेरीबद्दल फाशीची शिक्षा सुनावलीय. परंतु, आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणात दाद मागितल्यानंतर तिथं या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.