Factory Worker Won Rs 81 Crore Lottery: कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागल्यानंतर होणारा आनंद कधीही विसरण्यासारखा नसतो. एका व्यक्तीला एक दोन नाही तर चक्क 81 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. पण लॉटरी विजेता पैसै खर्च करण्यासाठी पत्नीच्या शोधात आहे. 24 सप्टेंबर रोजी जर्मनीतील डॉर्टमुं येथील रहिवासी कुर्सैट यिल्दिरिम (Kursat Yildirim) ला €9,927,511,60 म्हणजे जवळपास  81 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉटरी लागल्यानंतर कुर्सैटने स्टील मिलमधील नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर त्याने एक फेरारी 448 पिस्टा  (Ferrari 448 Pista) कारसाठी 3.6 कोटी आणि  पोर्शने टर्बो एस कॅब्रिओलेट खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपये खर्च केले. शिवाय कुर्सैटने त्याच्या आवडीचं घड्याळ आणि महागडी वाईन देखील खरेदी केली आहे. 


लॉटरी लागल्यानंतर  कुर्सैट पत्नीच्या शोधात
 कुर्सैट 41 वर्षांचा असून तो जोडीदाराच्या शोधात आहे. जिच्यासोबत  कुर्सैट एक रॉयल आयुष्य जगू शकतो.  कुर्सैटने एका मुलाखतीत सांगितलं, 'मी अद्याप अविवाहित आहे. ती गोरी किंवा सावळी असेल मला काहीही फरक पडत नाही. मला फक्त एक चांगली पत्नी हवी आहे.'


कुर्सैट पुढे म्हणाला, 'मला प्रेमात पडायचं आहे. ज्या मुलीला फिरायला प्रचंड आवडतं मला अशी मुलगी हवी आहे. मला तिच्यासोबत एक कुटुंब सुरु करायचं आहे. मला माझ्या आयुष्यात अशी महिला जिच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवू शकेल..' असं देखील कुर्सैट म्हणाला. (Trending News)